Saibaba 
सोलापूर

साईबाबा मालिकेला लाभले पंढरपूरच्या विनोद शेंडगे यांचे संगीत ! पंढरपूरच्या स्टुडिओतच रेकॉर्डिंग

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : टीव्हीवरील मालिकांचे पार्श्वसंगीत हे अद्ययावत स्टुडिओमध्ये तयार करून दिले जाते. यासाठी बहुसंख्य प्रमाणात मुंबई अथवा पुणे येथील स्टुडिओंचा वापर होतो. पण मराठी टेलिव्हिजन सृष्टीमध्ये प्रथमच साईबाबा यांच्या मालिकेचे पार्श्वसंगीत हे पंढरपूरच्या विनोंद शेंडगे यांच्या पंढरपूर येथील अनाहत रेकॉर्डिंग स्टुडिओच्या माध्यमातून होत आहे. 

साईबाबांच्या जीवनावर नवी मालिका येत आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील शीर्षक गीतासह संपूर्ण मालिकेला पंढरपूरचे कलावंत विनोद शेंडगे यांचे संगीत दिग्दर्शन लाभले आहे. या मालिकेसाठी साईबाबांची महती सांगणारे आणि भजन व सुफी संगीताचा मिलाफ साधणारे शीर्षक संगीत पंढरपूरच्या विनोद शेंडगे यांनी दिले आहे. हे गीत ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायिले आहे. तर मालिकेचे दिग्दर्शक प्रसाद ठोसर यांचे शब्द या गीतांस लाभले आहेत. शिवाय या संपूर्ण मालिकेचे पार्श्वसंगीत देखील शेंडगे सध्या देत आहेत. या मालिकेचे कार्यकारी निर्माते नरेंद्र तावडे, कला दिग्दर्शक अजित दांडेकर यांचेही सहकार्य शेंडगे यांना मिळत आहे. 

विनोद शेंडगे हे गेल्या पंचवीस वर्षांपासून संगीत विश्वात कार्यरत आहे. अत्यंत अद्ययावत असा ग्रामीण भागातील पहिला रेकॉर्डिंग स्टुडिओ त्यांनी पंढरपूरात "अनाहत' या नावाने सुरू केला. अनेक राज्यस्तरीय सांगितीक स्पर्धा अथवा कार्यक्रमांमध्ये शेंडगे यांचा सहभाग असतो. शेंडगे यांनी यापूर्वी "तू माझा सांगाती...' या मालिकेमध्ये देखील संगीत विभागाचा भार स्वीकारला होता. तसेच काही अभंगांचे देखील गायन केले होते. 

साई राम म्हणा, साई श्‍याम म्हणा... साई माझी माउली, साई माझी सावली... असे बोल असणारे गीत वारकरी सांप्रदायिक भजनी अंगाने संगीतबद्ध करण्यात आले आहे. विशेष म्हणजे साईबाबांच्या सर्व स्तरांवरील भक्तांचा विचार करता. सुफी संगीताचा देखील भजनी ठेक्‍यात वापर केला गेल्याने हे गीत संगीत विश्वात अधित पसंतीस उतरेल, असा विश्वास संगीत दिग्दर्शक विनोंद शेंडगे यांनी व्यक्त केला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

Mangalevedha Basaveshwar Memorial News: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी सह्यांची लाट; एका दिवसात 1040 नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

SCROLL FOR NEXT