उंजल दासी sakal
सोलापूर

सोलापूर : नाना पटोले यांनी चिमुकलीसाठी आपले हेलिकॉप्टर देऊन केली मदत

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे रविवारी सोलापुरात आले होते

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे रविवारी सोलापुरात आले होते. यावेळी त्यांनी एका हृदयरोगग्रस्त चिमुकलीला मुंबईला नेण्यासाठी आपले हेलिकॉप्टर देऊ केले आणि स्वत: रेल्वेने जाण्याचा निर्णय घेतला. याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. उंजल तुकाराम दासी (वय ४) या चिमुकलीला हृदयविकाराच्या उपचाराकरिता मुंबईला तातडीने पोहोचविणे गरजेचे होते. तिचे वडील तुकाराम दासी (रा. सुनील नगर, एमआयडीसी, सोलापूर) यांनी याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांची भेट घेतली आणि मुलगी उंजल हिची हृदयविकारावरील शस्त्रक्रिया तातडीने करणे गरजेचे आहे, वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमदार शिंदे यांनी नाना पटोले यांना उंजल दासी हिस उपचारासाठी पाठविण्याकरीता हेलिकॉप्टर देण्याची विनंती केली. त्यानुसार नाना पटोले यांनी स्वत: रेल्वेने परत जाण्याचे ठरवून उंजल दासी हिला मुंबईला उपचाराकरीता नेण्यासाठी आपले हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले. आणि साेलापुरातील कार्यक्रम आटोपून ते रेल्वेने मुंबईकडे रवाना झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT