3article_20images_2.jpg
3article_20images_2.jpg 
सोलापूर

राष्ट्रीय रस्ते महामार्ग विकासची पुन्हा चूक ! होनमुर्गीजवळ फुटली पाईपलाईन; शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर- विजयपूर महामार्गाचे काम सुरु असताना टाकळीवरुन शहराला येणारी पाईपलाईन फुटली आहे. हजारो लिटर पाणी वाया गेले असून आता पाणी बंद केले आहे. पाईपलाईनच्या कामाच्या दुरुस्तीसाठी आठ-दहा तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत होणार आहे. कधी महावितरणमुळे तर आता महामार्गांच्या कामामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचा त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे.

ठळक बाबी...

  • सोलापूर- विजयपूर रोडचे काम करताना होनमुर्गी फाट्याजवळ फुटली पाईपलाईन
  • शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत; आठ-दहा तास दुरुस्तीसाठी लागणार
  • एक हजार एमएमचा पाईप असतानाही दुसऱ्यांदा हलगर्जीपणा; अधिकाऱ्यांशिवाय सुरु आहे महामार्गाचे काम
  • शहराच्या पाणीपुरवठ्याचे एक रोटेशन जाणार पुढे; हजारो लिटर पाणी गेले वाया

विजयपूर महामार्गाचे काम करताना त्याठिकाणी रस्ते विकास महामंडळाचा कोणताच वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याचे पहायला मिळाले. त्याठिकाणाहून ये- जा करणाऱ्यांनी पाईपलाईन फुटल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर टाकळीवरुन सुरु असलेला पाणीपुरवठा तत्काळ थांबविण्यात आल्याची माहिती स्मार्ट सिटीचे अभियंता संजय धनशेट्टी यांनी दिली. फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यासाठी आठ- दहा तास लागणार आहेत. यापूर्वीदेखील असाच प्रकार झाला होता, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले. शहराच्या पाणीपुरवठ्याचे एक रोटेशन पुढे जाईल. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT