सोलापूर

रक्षाला योगा सरावांमुळे मिळाले सलग तीन वर्षे सुवर्णपदक

विजय थोरात

योगाच्या सततच्या सरावांमुळे राष्ट्रीय स्पर्धेत सलग तीन वर्ष सुवर्णपदक मिळाले असल्याचे रक्षा गोरटे यांनी सांगितले.

सोलापूर: ज्ञानप्रबोधिनी बाल विकास मंदिर येथे इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेत असताना योगा करण्यास सुरवात केली. त्यानंतर योगा प्रशिक्षिका स्नेहल पेंडसे यांनी रक्षा गोरटे यांच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांना योगाबद्दल अधिक माहिती दिली. (रक्षाचे वडील मिलिंद गोरटे हे राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू तर आई आरती गोरटे ह्या राष्ट्रीय योगा खेळाडू आहेत.) योगाच्या सततच्या सरावांमुळे राष्ट्रीय स्पर्धेत सलग तीन वर्ष सुवर्णपदक मिळाले असल्याचे रक्षा गोरटे यांनी सांगितले.

इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत असताना त्यांना शालेय स्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. त्याच वर्षी राष्ट्रीय शालेय स्पर्धेतही पदक मिळाले. रक्षा गोरटे ही आशियाई व जागतिक स्पर्धेतील रौप्य पदक विजेती आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. वैयक्‍तिक योगासनात सलग तीन वर्षे त्यांनी सुवर्णपदक जिंकले आहे. कर्नाटक येथील मुडबिद्री, झारखंड येथील रांची त्याचबरोबर उत्तर प्रदेश येथील गाजियाबाद मधील स्पर्धेत रक्षा गोरटे हिने प्रथम क्रमांक मिळविला होता.

योगा स्पर्धेमुळे गोरटे हिला कथक परीक्षा एक वर्ष देता आली नाही. मात्र गोंदिया येथे योगा स्पर्धेसाठी गेल्यानंतर तेथे प्रथम क्रमांक पटकाविला. योगा स्पर्धेबरोबर एनटीएस परीक्षेची तयारी देखील तिने अतिशय चांगल्या रितीने करुन यश संपादन केले आहे. आशियाई स्पर्धेसाठी बॅंकॉक येथे झालेल्या स्पर्धेत तिने चौथा, आणि सहावा क्रमांक मिळविला. त्याचबरोबर व्हिएतनाम येथील स्पर्धेत दोन रौप्य पदके मिळविली. क्वालालंपूर येथील जागतिक स्पर्धेत देखील दोन रौप्यपदके मिळवली असल्याचे तिने सांगितले.

ठळक बाबी...

- गोंदिया येथे झालेल्या योगा स्पर्धेत मिळाले सुवर्णपदक

- योगा स्पर्धेमुळे देता आली नाही कथ्थक परीक्षा

- सर्वप्रथम योगा स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षिसापासून झाली सुरुवात

- सध्या तळेगाव पुणे येथील एमआयएमइआर वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण सुरु

प्रत्येकाने मैदानावर आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी जाणे आवश्‍यक आहे. कारण बक्षीस तर आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील; मात्र शरीर ही सर्वांत मोठी संपत्ती आहे. त्यामुळे प्रत्येकाने दररोज मैदानावर जाउन आपल्या शरीराची काळजी घेणे आवश्‍यक आहे.

- रक्षा गोरटे, आंतरराष्ट्रीय योग खेळाडू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT