Madha Lok Sabha eSakal
सोलापूर

Madha Lok Sabha : "माढ्यात भाजपच्या विरोधात वातावरण", राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळेंची कबुली; विठ्ठल परिवाराची बैठक

माध्यमांशी बोलताना श्री. काळे यांनी विठ्ठल परिवाराची भूमिका नमूद करताना दोन्ही मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या विरोधात नाराजी असल्याचे स्पष्ट केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Kalyanrao Kale : माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी भाजप उमेदवारांच्या विरोधात वातावरण आहे, अशी स्पष्ट कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट) तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी दिली आहे. काळेंच्या या कबुलीने महायुतीच्या गोटात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे भगीरथ भालके यांनी लोकांच्या कलानुसार निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवाराने कोणती राजकीय भूमिका घ्यावी, याविषयी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी कल्याणराव काळे, भगीरथ भालके, युवराज पाटील, गणेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गावनिहाय बैठका घेण्यात आल्या. शुक्रवारी (ता. 5) सोलापूर लोकसभा मतदार संघातील 39 गावातील पदाधिकाऱ्यांशी तर शनिवारी (ता. 6) माढा लोकसभा मतदारसंघातील 58 गावातील पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

त्यानंतर आज माध्यमांशी बोलताना श्री. काळे यांनी विठ्ठल परिवाराची भूमिका नमूद करताना दोन्ही मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या विरोधात नाराजी असल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी काळे म्हणाले, तालुक्याच्या राजकारणात विठ्ठल परिवाराची ताकद मोठी आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीपूर्वी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जातो. त्यानुसार लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

यामध्ये काही लोकांनी पहिल्या उमेदवाराविषयी नाराजी असल्याचे सांगितले. काहींनी कामे झाली नाहीत असे सांगितले. त्यामुळे लोकांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. मतदारांची मानसिकता बदलली आहे. आम्ही ही ग्राउंड रिपोर्ट घेतला असता, भाजप विरोधात वातावरण असल्याचे दिसून आले आहे. तरी देखील आम्हाला हे वातावरण सकारात्मक करावे लागणार आहे. त्या दृष्टीने आम्ही कामाला सुरवात केली आहे., असे सांगितले.

लोकांच्या कलानुसार निर्णय घेणार

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा सुरू आहे. दोन दिवस पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली आहेत. पुढच्या दोन दिवसात मंगळवेढा तालुक्यातील कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांची मते जाणून घेणार आहे. लोकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा जो कल असेल त्यानुसार माढा आणि सोलापूर लोकसभा मतदार संघात निर्णय घेणार असल्याचे भगीरथ भालके यांनी सांगितले.

बैठकीच्या माध्यमातून आम्ही लोकांची मते जाणून घेतली आहे. जनभावनेचा विचार करूनच आम्ही निर्णय घेणार आहोत. निर्णय घेत असताना विठ्ठल परिवार म्हणून आम्ही तो घेऊ. मी वैयक्तिक शरद पवार यांच्यासोबत कायम राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT