nep class attendance for students due to credit system academic year of university starts from 12th June Sakal
सोलापूर

क्रेडिट पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना वर्गातील हजेरीचे बंधन; १२ जूनपासून विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष १२ जूनपासून सुरू होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पदवी व पदव्युत्तर पदवीसाठी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होत आहे. गुणांच्या टक्केवारीसोबतच विद्यार्थ्यांना क्रेडिट सुद्धा मिळवावे लागणार आहेत.

प्रत्येक सेमिस्टरला २२ क्रेडिट घेणे आवश्यक राहील. एका विषयाचे चार क्रेडिट मिळविण्यासाठी विद्यार्थ्याला आता घड्याळी ६० तास वर्गात बसावेच लागणार आहे. वर्गात न बसणे विद्यार्थ्यांच्या अंगलट येणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष १२ जूनपासून सुरू होणार आहे. महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्याला एक क्रेडिट घेण्यासाठी घड्याळी १५ तास वर्गात बसावे लागेल. चार विषयांपैकी एक विषय पूर्ण शिकून चार क्रेडिट मिळवायचे आहेत. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला शनिवार, रविवारची सुटी सोडून तीन महिन्याच्या सेमिस्टर काळात घड्याळी ६० तास त्या विषयाच्या अध्यापनासाठी वर्गात बसावे लागणार आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार परीक्षेचा पॅटर्न आता ६०-४० असा असणार आहे. त्यात ६० गुणांची लेखी परीक्षा विद्यापीठ स्तरावर तर ४० गुणांची परीक्षा महाविद्यालय स्तरावर होणार आहे.

विद्यार्थ्याच्या गुणांची टक्केवारी ९०- ९५ टक्के असेल आणि क्रेडिट ठरल्याप्रमाणे न मिळाल्यास त्या विद्यार्थ्याला पदवी प्रमाणपत्र मिळणार नाही. त्यासाठी त्याला तेवढे क्रेडिट घ्यावेच लागणार आहेत. नवीन धोरणानुसार विद्यार्थ्यांचे वर्गातील हजेरी वाढून त्यांची गुणवत्ताही वाढेल, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

अशी असणार क्रेडिट सिस्टिम

शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला प्रत्येक विद्यार्थ्याला ॲकॅडमिक बॅंक क्रेडिट’ (एबीसी) खाते तयार करून घ्यावे लागणार आहे. त्या विद्यार्थ्याने प्रत्येक विषयाला प्रत्येक सेमिस्टरमध्ये मिळविलेले क्रेडिट त्या खात्यात जमा होतील. प्रत्येक सेमिस्टरला २२ क्रेडिटचे बंधन आहे.

त्यात एका सेमिस्टरमध्ये एका विषयात किमान चार क्रेडिट (चार विषयांचे १६ क्रेडिट) घ्यावे लागतील. त्याशिवाय फिल्डवर्कसाठी चार क्रेडिट आणि ‘इंडियन नॉलेज सिस्टिम’अंतर्गत (काही अभ्यासक्रमासाठी डेझरटेशन द्यावे लागेल तर काही अभ्यासक्रमाअंतर्गत ‘भारतीय ज्ञान परंपरे’चे दोन विषय निवडून अध्यापन करावे लागणार आहे) दोन क्रेडिट आहेत.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमात विद्यार्थ्याला गुणांच्या टक्केवारीसोबतच प्रत्येक सेमिस्टरला २२ म्हणजेच दरवर्षी ४४ क्रेडिट घ्यावेच लागतील. पदवीच्या एकूण चार वर्षात त्या विद्यार्थ्याला १७६ क्रेडिट घ्यावे लागणार आहेत. त्याशिवाय त्याची पदवी पूर्ण झाली असे ग्राह्य धरले जाणार नाही.

- प्रा. डॉ. गौतम कांबळे, संचालक, सामाजिकशास्त्र संकुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Deepfake Rules : बनावट व्हिडिओ अन् बातम्या पसरवाल तर थेट तुरुंगात जाल! संसदेत AI डीपफेक कायद्यावर मोठा निर्णय, नक्की वाचा

पाकिस्तानचे प्रेक्षकही पलटले! संघ हरतोय दिसताच हिरव्या जर्सीवर चढवली टीम इंडियाची जर्सी; Viral Video

Supreme Court : वक्फ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 'या' तरतुदींना दिली स्थगिती, संपूर्ण कायदा रद्द करणार?

Mumbai Rain: मुंबईत विजांसह ढगांचा गडगडाट! पुढील ३ तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

...अन् आईचे अश्रू बदलले आनंदाश्रूत, नऊ महिन्यांच्या बाळाने गिळलेली सेफ्टी पिन डॉक्टरांनी काढली बाहेर

SCROLL FOR NEXT