New 30 percent taxpayer Income Tax Return new rule banking and electricity bills solapur sakal
सोलापूर

नव्या अटींमुळे वाढणार करदात्यांची संख्या

नवे ३० टक्के करदाते; आता बॅंक व्यवहार व वीजबिलाचेही निकष

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : यावर्षी आयकर विवरणपत्र भरण्यासाठी एकूण दहा नव्या अटींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे करदात्यांची संख्या १० ते २० टक्क्यांनी वाढणार आहे. आयकर विवरणपत्र भरण्याची मुदत ही ३१ जुलै आहे. तर एक कोटीपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या व्यक्ती व संस्थांसाठी आयकर विवरणपत्र ३० सप्टेंबरपर्यंत भरता येणार आहे. आता आयकर भरण्याबाबत नव्या अटी लावल्या आहेत. या अटी लावल्याने या अटींच्या परिघात मोठ्या संख्येने करदाते येणार आहेत.

अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांना विवरणपत्र भरावेच लागणार आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी ( ६० ते ८० वय) तीन लाख रुपयांची आणि ८० वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच लाख उत्पन्न मर्यादा आहे. ज्या नागरिकांची मालमत्ता विदेशात आहे त्यांना कर विवरणपत्र भरावे लागणार आहे. तसेच कोणी मागील आर्थिक वर्षात एक कोटी रुपये बॅंकेत जमा केले असतील तर त्यास विवरणपत्र द्यावे लागेल. विदेश दौऱ्यासाठी कोणी २ लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम खर्च केली असेल तर त्यांना विवरणपत्राचे बंधन असेल. मागील आर्थिक वर्षात ज्या नागरिकांनी १ लाख रुपयांची कमीतकमी वीजबिल भरले तर तेही करदात्यांच्या यादीत येणार आहेत.

व्यवसायाची उलाढाल ६० लाखांपेक्षा अधिक असेल तसेच व्यवसायातून १० लाख रुपये उत्पन्न मिळवणाऱ्यांना देखील विवरणपत्र भरावे लागेल. याशिवाय टीडीएस किंवा टीसीएसची मर्यादा ५० हजारांपेक्षा अधिक असेल तर त्यांनाही विवरणपत्र भरावे लागणार आहे.

या आहेत करदात्यांच्या नव्या अटी

  • उत्पन्न मर्यादा २ लाख ५० हजार रुपये

  • विदेशात मालमत्ता असणे

  • बॅंकेत १ कोटी रुपये भरणे

  • विदेश दौऱ्यासाठी २ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च

  • १ लाख रुपयांची वीज वापरणे

  • व्यवसायातून १० लाख रुपयांची कमाई

  • व्यवसायाची उलाढाल ६० लाखांपेक्षा अधिक

  • टीडीएस किंवा टीसीएस ५० हजारांपेक्षा अधिक

  • व्यवसायात तोटा असणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था

  • बचत खात्यात रुपये पन्नास लाख जमा करणे

या आर्थिक वर्षात आयकर विवरण भरण्यासाठी नव्या अटी लावल्या असल्याने आयकराच्या परिघात नव्या करदात्यांची संख्या वाढणार आहे. करदात्यांची संख्या या अटीमुळे १० ते २० टक्के वाढू शकते.

- सी. आर. इंजामुरी, चार्टर्ड अकांउंटंट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT