Corona
Corona  
सोलापूर

पंढरपूर शहर-तालुक्‍यात 65 कोरोनाबाधितांची भर; एकूण संख्या 684 

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर शहरातील 42 तर तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील 23 अशा 65 व्यक्तींचे आज कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. पंढरपूर शहर व तालुक्‍यातील आतापर्यंतची एकूणच बाधितांची संख्या आता 684 झाली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज पंढरपूर शहरामधील 42 व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील इसबावी भागात सर्वाधिक आठ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय शहरातील भोसले चौक येथे तीन, उमदे गल्ली येथील तीन, दत्तनगर येथील दोन, गाताडे प्लॉट येथील दोन, कालिका देवी मंदिर परिसर येथील दोन, पोलिस लाइन येथील दोन, विजापूर गल्ली येथील दोन आणि संत पेठ भागातील दोन व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय शहरातील अनिल नगर, भादुले चौक, डोंबे गल्ली, फत्तेपूरकर कॉलनी, गोविंदपुरा, जुनी पेठ, कराड नाका, कवठेकर गल्ली, क्रांती चौक, हरिदास वेस, महावीर नगर, मेंढे गल्ली, पद्मशाली धर्मशाळा, उत्पात गल्ली, व्यास नारायण झोपडपट्टी आणि वांगीकर नगर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

तालुक्‍याच्या ग्रामीण भागात आढीव येथील पाच, फुलचिंचोली, कोर्टी येथील प्रत्येकी तीन तर गादेगाव आणि लक्ष्मी टाकळी येथील प्रत्येकी दोन व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय भोसे, बोहाळी, करकंब, खेड भाळवणी, ओझेवाडी आणि सरकोली येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

दरम्यान, शहरातील इंदिरा गांधी भाजी मंडई जवळील कोरोनाबाधित एका व्यक्तीला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा नातेवाइकांनी प्रयत्न केला होता. परंतु संबंधित हॉस्पिटल प्रशासनाने त्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले नाही. त्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि कोरोना रुग्ण असून देखील संबंधित व्यक्तीचा मृतदेह नातेवाइकांना त्यांच्या घरी घेऊन जावे लागले, असा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT