अर्भक अर्भक
सोलापूर

पंढरपुरात तासाभरापूर्वी जन्मलेल्या बाळाला रस्त्यात सोडून पलायन

पोलिसांनी तिघाजणांविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

पंढरपूर : एक तासापूर्वी जन्माला आलेल्या पुरुष जातीच्या (Male Infant) बाळाला रस्त्याच्या मधोमध सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार पंढरपूर (Pandharpur) येथे समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, अल्पवयीन आई मुलगी, रिक्षाचालक, मुलीचा भाऊ, आई, वडील यांच्याविरोधात पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(New Born Male Infant Found On Road)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली रहिवासी अविनाश नागनाथ वसेकर (वय 32) शनिवारी रात्री त्यांच्या कुंटूबासह चारचाकीने देवदर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी नारायण चिंचोली येथील पाण्याच्या टाकीसमोर ते आले असता त्यांना रस्त्याच्या मधोमध साधारण एक ते दोन तासांपूर्वी जन्माला आलेले नवजात पुरूष जातीचे अर्भक असल्याचे निर्दशनास आले. यानंतर संबंधित कुटुंबियांनी नवजात बाळाला उपचारासाठी म्हणून पंढरपूर येथील शितल शाह यांच्या रूग्णालयात दाखल केले. याठिकाणी बाळावर सुमारे 17 दिवसांच्या उपचारानंतर बाळाला नवरंगे बालकाश्रमात येथे देखभालीसाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास केला असता, बाळाची आई अल्पवयीन असल्याचे उघड झाले असून, अल्पवयीन मुलीबरोबर तिघांनी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवलेही समोर आले आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांसह चार जणांचे डी एन ए तपासण्यासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघाजणांविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, किरण उर्फ भैय्या शशिकांत दावणे व दत्ता परमेश्वर खरे या दोन तरुणांना अटक केली असून आणखीन एकाच्या शोधात पोलीस आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये हनुमान जयंती निमित्ताने 51 फूट उंच मारुती च्या दर्शनाला गर्दी

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT