solapur court building esakal
सोलापूर

सोलापूर : न्यायालयाच्या नवीन इमारतींची होणार उभारणी

‘विधी व न्याय’कडे बार्शी अन्‌ सोलापूरचा प्रस्ताव; १०० कोटींचा होईल खर्च

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या(PWD) वतीने राज्य मार्गांची उभारणी केली जात असून यंदा सोलापूर-बार्शी, बार्शी-परांडा-उस्मानाबाद आणि कोर्टी-करमाळा-आवाटी या मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. दुसरीकडे अंदाजित १०० कोटींचा खर्च करून सोलापूर व बार्शी न्यायालयाच्या (solapur and barshi court)नव्या इमारतींचे बांधकामदेखील यावर्षी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी दोन्ही प्रस्ताव विधी व न्याय(Law and justice) विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ते, नदी-नाल्यांवरील पूलाची उभारणी, नवीन शासकीय इमारती, निवासस्थानांची कामे केली जातात. दरवर्षी साधारणपणे १०० ते १२० कोटींचे बजेट असते. त्यातून विविध कामे मार्गी लावले जातात. काही दिवसांपूर्वी शहरातील उर्दू भवनाचे काम पूर्ण झाले आहे. तर कुर्डुवाडीतील ट्रामा केअर सेंटरचे भूमिपूजन पार पडले आहे. विधी व न्याय विभागाच्या मंजुरीनंतर सोलापूर व बार्शी न्यायालयाच्या इमारतींचे काम हाती घेतले जाणार आहे. तसेच सोलापूर-बार्शी यासह अन्य रस्त्यांची कामेही मार्गी लागतील, असा विश्‍वास सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्‍त केला आहे. काही महिन्यांपूर्वी सीना नदीवरील कुंभेज-खैराव हा पूल बांधून पूर्ण करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हा रुग्णालयाचेही काम यावर्षीच पूर्ण होणार आहे. शासनाकडून जसा जसा निधी उपलब्ध होईल, त्यानुसार कामांचे नियोजन करुन ते पूर्ण केले जात आहे.

नवीन वर्षातील कामांचे नियोजन...

कुर्डूवाडीतील ट्रामा केअर सेंटरची उभारणीजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण केले जाईलसोलापूर, बार्शी न्यायालयाच्या इमारतींचे काम सुरु होईलसोलापूर-बार्शी, बार्शी-परांडा राज्य महामार्ग होईल पूर्णसार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाची उत्तमरित्या वाटचाल सुरु आहे. उपलब्ध बजेटमध्ये उत्कृष्ट कामांचे नियोजन केले आहे.

- विलास मोरे, अधीक्षक अभियंता, पीडब्ल्यूडी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav: गणपती आगमन-विसर्जनासाठी महत्त्वाची बातमी! मुंबईतील १२ पूल धोकादायक, महापालिकेचं आवाहन

World Cup 2011 Final मध्ये युवराजच्या आधी धोनीने फलंदाजीला येण्याचं खरं कारण काय? सचिन तेंडुलकरनेच सांगितलं सत्य

Latest Maharashtra News Updates: आरबीआयचे महागाई सर्वेक्षण सूरु

Selfie death: सेल्फीमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल; २७१ बळी, इतर देशांमध्ये काय परिस्थिती?

Pig: जगभरात सर्वाधिक वराह कोणत्या देशात आहेत? भारतातले कोणते राज्य आहे आघाडीवर?

SCROLL FOR NEXT