सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील 49 गावात सुरु होणार नव्याने रास्त भाव दुकान 

संतोष सिरसट

सोलापूर ः जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत वाढीव लोकसंख्येमुळे आणखी 49 गावात रास्त भाव दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. दुकानासाठी अर्ज करण्याची मुदत कार्यालयीन वेळेत दोन नोव्हेंबर ते दोन डिसेंबर असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल कारंडे यांनी दिली आहे. 

सध्याची रास्त भाव दुकाने, किरकोळ केरोसिन परवाने तसेच ठेवून रद्द असलेली व यापुढे रद्द होणारी, राजीनामा दिलेली आणि लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची नवीन दुकाने व किरकोळ केरोसिन परवाने शासनाने दिलेल्या प्राथम्य क्रमानुसार मंजूर करण्यात आले आहेत. सर्वात जास्त बार्शी तालुक्‍यात 14 दुकाने, माळशिरस 12 दुकाने मंजूर झाली आहेत. गावातील पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था यांना रास्त भाव दुकानासाठी अर्ज करता येणार आहे. गावातील गटाची किंवा संस्थेची प्राधान्यक्रमानुसार निवड करण्यात येणार आहे. मंजूर झालेल्या दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायाद्वारे करणे आवश्‍यक आहे. पूर्वी असलेल्या गटाला, संस्थेला दुसऱ्या दुकानासाठी अर्ज करता येणार नाही. गैरव्यवहार, रद्द केलेले दुकान यांनाही अर्ज करता येणार नाही. संस्था/गटाच्या सदस्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक असून अर्जासोबत दुकान मंजुरीच्या अटींची पूर्तता करणारी कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. सर्व कागदपत्रासह अर्ज विहित मुदतीत तहसील कार्यालयात सादर करण्याचे आवाहनही श्री. कारंडे यांनी केले आहे. 

संस्थांना किंवा गटांना हे असेल बंधनकारक 
संस्था अस्तित्वात असलेला कालावधी, सभासद संख्या, मागासवर्गीय सभासदांची संख्या, दारिद्रयरेषेखालील सभासदांची संख्या, बैठकाबाबतचे इतिवृत्त, सभासदत्व, लेखापरीक्षण आणि लेखे, विमा, शैक्षणिक पात्रता, स्वबचत, खेळते भांडवल, बॅंकेचा सहभाग, जागा, इतर वैशिष्ट्यपूर्ण कामाबाबतचा अहवाल आणि पुरावा. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Sambhajinagar Hostel Mess 'Mess': CIPET वसतिगृहात धक्कादायक प्रकार: विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या-मुंगळे; महिनाभरात दहा वेळा घटना

Sambhajinagar News: शहीद सैनिकांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी: MGM विद्यापीठात 100% मोफत शिक्षणासाठी भारतीय सैन्यदलासोबत करार

Sambhajinagar LPG News: गॅस तुटवड्यावर ‘सकाळ’चा दणका: बुढीलेनमध्ये हॉटेलवर छापा, घरगुती तीन सिलिंडर जप्त

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

SCROLL FOR NEXT