Pdr 
सोलापूर

श्री विठ्ठल मंदिरातील भंग पावलेल्या परिवार देवतांच्या नवीन मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठापना !

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : येथील श्री विठ्ठल मंदिरातील परिवार देवतांपैकी काही मूर्ती भंग पावल्या होत्या. या भंग पावलेल्या मूर्ती नव्याने तयार करून त्यांची मंदिर समितीचे सदस्य अतुलशास्त्री भगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज (गुरुवारी) विधिवत प्राणप्रतिष्ठाना करण्यात आली. 

श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरातील श्री व्यंकटेश मंदिराजवळील श्री धुंडिराज गणपती, शनि मंदिराजवळील श्री चिंतामणी गणपती, सोळखांबी गणपती, शनि मंदिरातील श्री दत्त, मंदिरातील बोधले महाराज ओवरीतील श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मूर्ती, श्री विष्णुपद मंदिरातील श्री विष्णू, परिवार देवतेच्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरा शेजारील श्री खंडोबा, श्री काळा मारुती मंदिरातील श्री शनि, श्री शनि काळभैरव मंदिरातील श्री नवग्रह, श्री विठ्ठल सभामंडप येथील श्री हणमंत (मारुती) व श्री गरुड या मूर्ती भंग पावल्या होत्या. 

पहिल्या तीन दिवसांत कलाकर्षण विधी, जुन्या भंग पावलेल्या मूर्तींचे तेज काढून घेण्याचा विधी करण्यात आला. चौथ्या दिवशी या सर्व मूर्तींचे हवन करण्यात आले. पाचव्या दिवशी सर्व मूर्तींवर जलाधिवास विधी करून स्तपन विधी करण्यात आला. त्यानंतर या सर्व नवीन मूर्तींना शैयाधिवास व धान्याधिवास करून सात दिवसात हा विधी संपन्न करण्यात आला. यामध्ये नवग्रह, स्थापत्य देवतांचे हवन, आरोहण असे यज्ञकर्म करण्यात आले. त्यानंतर त्या त्या मूर्तींची ब्रह्मवृंदांच्या मार्फत विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या सर्व विधीस यजमान म्हणून मंदिर समितीचे विभाग प्रमुख पदावरील कर्मचारी सपत्नीक उपस्थित होते. 

याप्रसंगी शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, प्रकाश महाराज जवंजाळ, सल्लागार परिषदेचे सदस्य प्रसाद महाराज अमळनेरकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी भारतात आला होता कसाब? उज्ज्वल निकमांचा धक्कादायक दावा, म्हणाले...

Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरे दुष्काळ दौरा भेटीसाठी परभणी दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT