cp rajendra mane sakal
सोलापूर

पोलिस आयुक्तांचे नवे आदेश! ‘सिमेंट’च्या जड वाहनांना सोलापुरात बंदी; परवानाधारक वाहनांना ताशी २० किमीचे बंधन

सिमेंट वाहतूक करणाऱ्या जड वाहनांना यापुढे सोलापूर शहरातून ये-जा करण्यास पूर्णत: निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलिसांची परवानगी नसलेल्या जड वाहनांना सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत शहरात ये-जा करता येणार नाही, असे आदेश पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी काढले.

सकाळ ऑनलाईन

सोलापूर : सिमेंट बल्कर व सिमेंटची वाहतूक करणाऱ्या जड वाहनांना आता यापुढे सोलापूर शहर हद्दीतून ये-जा करण्यास पूर्णत: निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच पोलिसांची परवानगी नसलेल्या जड वाहनांना सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत शहरातून ये-जा करता येणार नाही, असे आदेश पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी काढले आहेत.

अत्यावश्यक सेवेतील व परवानाधारक जड वाहनांना शहरातून ये-जा करताना ताशी २० किमी वेगाचे बंधन असणार आहे. तसेच एसटी स्टॅण्ड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्यावर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस वाहतुकीस सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंदी असणार आहे. नवीन अक्कलकोट नाका, शांती चौक, जुना बोरामणी नाका, मार्केट यार्ड हा मार्ग ज वाहनांच्या वाहतुकीसाठी २४ तास खुला असणार आहे.

सिमेंट वाहतूक करणाऱ्या व इतर जड वाहनांसाठी नवीन होटगी नाका-सिद्धेश्वर कारखाना, कुंभारी, नवीन अक्कलकोट नाका, शांती चौक, जुना बोरामणी नाका, मार्केट यार्ड चौक हा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. नवीन विजयपूर नाका येथून शहरात येवून बाहेर जाणारी जड वाहने हत्तूर-केगाव बायपासमार्गे जातील.

मार्केट यार्ड चौकातून विजयपूरकडे जाणारी जड वाहने मार्केट यार्ड, पुणे हायवे (केगाव ब्रिज) ते हत्तूर बायपास अशी जातील. सांगली, सातारा, कोल्हापूर व गोव्याला जाणारी जड वाहने पुणे हायवेवरील केगाव ब्रिजवरून हत्तूर बायपासमार्गे जातील. तर रेल्वे मालधक्का येथून सिमेंटसह इतर मालाची वाहतूक करणारी वाहने बंदी काळात मालधक्का ते देगाव रोड, या रस्त्याने ये-जा करतील, असेही पोलिस आयुक्तांच्या आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे.

पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार

  • जुना पूना नाका ते निराळे वस्ती व जुना पूना नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे भैय्या चौकाकडे जाणारी जड वाहतूक यापुढे कायमचीच बंद राहील.

  • यंत्रमागासाठी लागणारा कच्चा व पक्का माल वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी मार्केट यार्ड, जुना बोरामणी नाका, शांती चौक, कोंडा नगर व अक्कलकोट रोड ‘एमआयडीसी’तून ये-जा करण्यास दुपारी एक ते चार यावेळेत असणार परवानगी.

  • शहरात उतरणाऱ्या सर्व प्रकारच्या मालाची वाहतूक (सिमेंट व इतर) रात्री नऊ ते सकाळी सात यावेळेतच परवानगी असणार आहे.

  • आरटीओ कार्यालयात पासिंग व परवाना नूतनीकरणासाठी येणाऱ्या जड वाहनांना केगाव बायपासमार्गे जुना विजापूर नाका, विजयपूर रोडमार्गे आणि अक्कलकोटवरून येणाऱ्या जड वाहनांना कुंभारीमार्गे सिद्धेश्वर कारखाना, होटगी नाका, आसरा चौक, जुळे सोलापूर या मार्गावरून ये-जा करण्यास परवानगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT