dilip mane 
सोलापूर

नूतन अध्यक्ष दिलीप माने : दूध संघासाठी तयार करणार आराखडा

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी येत्या आठवड्यात आराखडा तयार केला जाणार आहे. या आराखड्याची अंमलबजावणी येत्या काळात केली जाणार असल्याची माहिती दूध संघाचे नूतन अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप माने यांनी दिली. सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी दिलीप माने यांची आज बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर ते बोलत होते. 

आमदार परिचारक यांचा राजीनामा संचालक मंडळाने नामंजूर केल्याचे कारण देत औदुंबर वाडदेकर व जयंत साळे या दोन संचालकांनी न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आल्याने निवडीचा मार्ग मोकळा झाला. माजी आमदार गणपतराव देशमुख, माजीमंत्री दिलीप सोपल, माजी आमदार राजन पाटील, आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार दीपक साळुंखे, बबनराव आवताडे यांच्या उपस्थितीत सातरस्ता येथील शासकिय विश्रामगृहात बैठक झाली. याच बैठकीत माजी आमदार माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यानंतर दुपारी अडीच वाजता अध्यक्ष निवडीसाठी संघाच्या मुख्य कार्यालयात जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक दुग्ध सुनील शिरापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया झाली. 

अध्यक्षपदासाठी एकच अर्ज प्राप्त झाल्याने ही निवड बिनविरोध झाली. माने यांच्या अर्जावर सूचक म्हणून बबनराव आवताडे तर अनुमोदक म्हणून विजय येलपले यांनी स्वाक्षरी केली. यावेळी व्हाईस चेअरमन मनोहर डोंगरे यांच्यासह संचालक उपस्थित होते. अध्यक्ष निवडीनंतर माजी आमदार देशमुख, माजी आमदार सोपल यांनी यावेळी दूध संघापुढील आव्हाने, संघाची आर्थिक स्थिती याबाबत मनोगत व्यक्त केले. नूतन चेअरमन माने यांचा सत्कार माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT