Newly Married sakal
सोलापूर

पंढरपूर : नववधूला प्यायला दिले केमिकलयुक्त पाणी

पंढरपूर शहरातील कापड दुकानातील धक्कादायक प्रकार

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : लग्नाचा बस्ता खरेदीसाठी गेलेल्या नववधूला एका कापड दुकानात लायझोल टाकलेले केमिकलयुक्त पाणी प्यायला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दैव बलवत्तर म्हणून उपचारानंतर नववधूची प्रकृती स्थिर आहे. हा संतापजनक प्रकार येथील महावीर नगरमधील आविष्कार कापड दुकानात रविवारी (ता. ८) घडला आहे. याप्रकरणी संबंधीत कापड दुकानादाराविरोधात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील भानवसे कुटुंबीय आपल्या नववधूसह येथील आविष्कार कापड दुकानात लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी ८ मे रोजी आले होते. खरेदीदरम्यान नववधू तरुणीला तहान लागली म्हणून तिने कापड दुकानातील कर्मचारऱ्याकडे पाण्याची मागणी केली. त्यावेळी कापड दुकानातील कर्मचाऱ्याने फरशी पुसण्यासाठी लायझोल टाकलेली केमिकलयुक्त पाण्याची बाटली पाणी म्हणून प्यायला दिली. तहानेने व्याकुळ झालेल्या नववधूने तेच केमिकल युक्तपाणी पिले. काही वेळाने तिल अस्वस्थ वाटू लागल्याने तीने नातेवाईकांना ही प्रकार सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी तिला ता़तडीने येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दोन दिवसाच्या उपचारानंतर आता नववधूची प्रकृती स्थिर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. वेळीच नववधूला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केल्यामुळे नववधूवरील संकट थोडक्यात निभावल्याने नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. याप्रकरणी नववधूच्या नातेवाईकांनी आविष्कार कापड दुकान मालका विरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार कापड दुकानराची चौकशी करुन त्यानंतर त्यांच्यावर पुढील कादेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी सांगितले.

निष्काळजीपणा ग्राहकांच्या जीवावर

येथील आविष्कार कापड दुकानदाराच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे. येथील कापड दुकानात नेहमीच ग्राहकांची मोठी वर्दळ असते, परंतु दुकानदाराकडून ग्राहकांसाठी पिण्याचे पाणी व पार्किंची सोय केली जात नाही. त्यामुळे ग्राहकांना अशा संकटांना तोड द्यावे लागते. येथे येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांसाठी पार्किंगची कोणतीच सोय नसल्याने दुकानासमोरील रस्त्यावरच वाहनांची गर्दी असते. त्यामुळे वर्दळीच्या या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT