Solapur Crime 
सोलापूर

मटका बुकीचा व्यवसाय झाकण्यासाठी कामाठी द्यायचा हप्ते ! वाचा शहरातील इतर गुन्हेगारी वृत्त

तात्या लांडगे

सोलापूर : भाजप नगरसेवक सुनील कामाठी हा स्वत:चा मटका बुकीचा व्यवसाय विनाखंडित, विनाअडथळा सुरू राहावा यासाठी काही लोकांना हप्ते देत होता. मटका बुकीच्या चौकशीदरम्यान हप्ते देणाऱ्या व्यक्‍तींचे रजिस्टर पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यात सांकेतिक स्वरूपात नावे टाकली असून, त्यापुढे आकडेमोड करण्यात आली आहे. त्याची चौकशी आता सुरू करण्यात आली असून, कामाठी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्याच्याकडूनही कसून चौकशी सुरू आहे. त्या रजिस्टरमध्ये पोलिस विभागासह काही राजकीय व्यक्‍तींचीही नावे असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. 

विनामास्क वाहनचालकांकडून साडेसहा लाखांचा दंड वसूल 
शहरातील कोरोनाचा ससंर्ग वाढू नये म्हणून शहर पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांसह विनामास्क प्रवास करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. 17 ऑगस्टपासून ही कारवाई सुरू केली असून दिवसातून दोनदा शहरातील सात पोलिस ठाण्याअंतर्गत ही कारवाई केली जात आहे. आतापर्यंत शहर पोलिसांनी साडेसहा हजारांहून अधिक बेशिस्त वाहनचालकांकडून साडेसहा लाखांचा दंड वसूल केला आहे. पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे. 

भांडण सोडविणाऱ्यालाच केली मारहाण 
रूपाभवानी पाणी गिरणीसमोर राहात असलेल्या महेश रमेश शेवाळे हे मित्रासोबतचे भांडण सोडविण्यासाठी गेले. त्या वेळी प्रशांत यल्लप्पा शिवशरण याने शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने फायटरने डोक्‍यात व पाठीत मारहाण करून जखमी केले. तत्पूर्वी, मित्र आनंद राजमाने हा त्याच्या आईसमवेत घरी आला होत्या. त्या वेळी प्रशांत शिवशरण हा आमच्या घरी येऊन मित्रसोबत भांडण करू लागला. ते भांडण सोडविण्यासाठी गेल्यानंतर शिवशरणने मारहाण केली, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार शिवशरणविरुद्ध जोडभावी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

दुचाकीचा धक्‍का लागल्याने केली मारहाण 
तुझ्या मुलाने गाडीचा मुद्दाम धक्‍का मारला. त्या वेळी तुझ्या बापाला बोलावून घे, तुला आणि त्यालाही बघतो म्हणत पाच जणांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची फिर्याद अर्जुन ऊर्फ समर सुधाकर तळभंडारे (रा. बुधवार पेठ) यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली आहे. त्यानुसार उमेश परशुराम व्हनकस्तुरे, रवी परशुराम व्हनकस्तुरे, रमेश परशुराम व्हनकस्तुरे, सुरेश व्हनकस्तुरे (रा. सर्वजण प्रभाकर महाराज मठाजवळ) आणि राहुल कोंडिबा गायकवाड (रा. मिलिंद नगर, बुधवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

खून प्रकरणात बंदपट्टेला जामीन 
दारू पिऊन आई व बहिणीस कायम त्रास देणाऱ्या आण्णासाहेब सुरेश घोडके याचा खून करून त्याचा मृतदेह तरटगाव (ता. मोहोळ) येथे टाकला, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले. तत्पूर्वी, मृताची पत्नी अनिता घोडके यांनी पतीच्या खुनाची फिर्याद कामती पोलिसांत दिली होती. त्यानुसार श्रीकांत बंदपट्टेविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला. मात्र, तो अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्याने ऍड. रितेश थोबडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्या वेळी प्रत्यक्षदर्शी कोणताही पुरावा नसल्याचा युक्तिवाद करीत संशयित आरोपीस जामीन द्यावा, असा युक्‍तिवाद त्यांनी केला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT