Nine injured in tractor trolley reversal in Solapur district 
सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात ट्रॅक्टर, ट्रॉली उलटल्याने नऊ जखमी

वसंत कांबळे

कुर्डू (सोलापूर) : सिना माढा उपसा सिंचन योजनेच्या कॅनॉलमध्ये ट्रॅक्टर व ट्रॉली उलटल्याने नऊजण जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता. २३) व्होळे (ता. माढा) येथे भेंड रोडवर जयंत पाटील यांच्या वस्तीजवळ साकाळी सातच्या सुमारास घडली आहे. जखमींमध्ये पाच पुरुष व चार महिलांचा समावेश आहे.

कॅनॉलमध्ये उलटलेला ट्रॅक्टर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर या कारखान्याचे ऊस तोड कामगार   लऊळ (ता. माढा) येथून व्होळे  येथे ऊसतोडणीसाठी जात होता. सरिता साळुखे (वय १७), अरुण साळुखे (वय २२, रा. लातूर), कृष्णा पवार (रा. खुदनपूर, ता. भालकी), आबाजी काशिनाथ साळुखे (वय ३२, रा. भालकी  जि. बिदर), दीपक उत्तम साळुखे (वय १२, लातूर), अरुण साळुखे  (रा. चिंचोली, ता. भालकी), छकु साळुखे (वय २४, भालकी, जिल्हा बिदर) , श्रीदेवी पवार (वय २३, रा. चिंचोली, ता. भालकी), रेखा साळुखे (वय २५, रा. भालकी, जिल्हा बिदर) अशी जखमीची नावे आहेत.
कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केले आहे. डॉ. संतोष आडगळे,  स्मिता पॉल, सुनिता गिराम, राजु परचा , संतोष चव्हाण या पथकाने तातडीने उपचार सुरु केले आहेत. काही जणांना सोलापूर येथे तपासणीचा सल्ला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT