1Corona_20akola_2001_1.jpg 
सोलापूर

विजयपूर रोड परिसरात आढळले नऊ रुग्ण ! आज 40 पॉझिटिव्ह तर झोपडपट्टीतील 64 वर्षीय महिलेचा मृत्यू 

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापुरातील रेल्वे लाईन्स्‌, सैफूल, जुळे सोलापूर, विजयपूर रोड, कुमठा नाका, कुमठे या परिसरात रुग्ण आढळत आहेत. आज आढळलेल्या 40 रुग्णांमध्ये नऊ रुग्ण विजयपूर रोड परिसरातील आहेत. दुसरीकडे 'माझे कुटूंब माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत मागील काही दिवसांपासून को-मॉर्बिड रुग्णांचा घरोघरी सर्व्हे केला जात आहे. तरीही 60 वर्षांवरील व्यक्‍तीच कोरोनाच्या बळी ठरत असल्याचे विशेष. दरम्यान, नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्कचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून केले जात आहे.

ठळक बाबी... 

  • आतापर्यंत शहरातील 97 हजार 30 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • शहरातील नऊ हजार 612 व्यक्‍तींना झाली कोरोनाची बाधा 
  • आज एक हजार 385 संशयितांमध्ये 18 पुरुष व 22 महिला निघाल्या पॉझिटिव्ह 
  • विजयपूर रोडवरील गरिबी हटाव झोपडपट्टी- 2 मधील 64 वर्षीय महिलेचा मृत्यू 
  • आतापर्यंत आठ हजार 621 रुग्णांची कोरोनावर मात; 456 रुग्णांवर सुरु आहेत उपचार 

आज शहरात हिंदुस्थान शाळेजवळ, सात रस्ता, अशोक नगर, झोपडपट्टी क्र. एक, आनंद नगर, द्वारका नगर (विजयपूर रोड), जानकी नगर (आसरा), उत्तर कसबा (चौपाड), सर्वोदय हाईट्‌स (वसंत विहार), पाटील नगर, कृष्णा नगर (सैफूल), सदिच्छा नगर, संतोष नगर, गोकुळधाम (जुळे सोलापूर), आयकर नगर (रंगभवन), नवोदय नगर (होटगी रोड), बाल शिवयोगी नगर (कुमठा नाका), अवसे वस्ती (आमराई), दमाणी नगर, अशोक चौक (पाच्छा पेठ), आदित्य नगर, संगमेश्‍वर कॉलेजमागे, युनायटेड रेसिडेन्सी (रेल्वे लाईन्स), हेरिटेज अपार्टमेंट (दक्षिण सदर बझार), सिध्देश्‍वर पेठ, दक्षिण कसबा आणि शिवगंगा नगर येथे नव्याने रुग्ण आढळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT