Teacher_Recruitment 
सोलापूर

भावी गुरुजींसाठी ! 'टीईटी'तील नऊ प्रश्‍न केले रद्द 

तात्या लांडगे

सोलापूर : आठ वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती नव्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात मार्गी लागेल, या आशेने नुकत्याच झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी राज्यातून तीन लाख 43 हजार विद्यार्थी बसले. मात्र, या परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिकेतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना उत्तर लिहता आले नाहीत. त्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी तब्बल 45 तज्ज्ञांची नियुक्‍ती करुन अंतिम उत्तरसूची तयार करण्यात आली. दरम्यान, या परीक्षेतील पेपर एकचे सहा तर पेपर दोनचे तीन प्रश्‍न रद्द करण्याचा निर्णय तज्ज्ञांनी घेतला आहे. 


डीटीएड व बीएड, बीपीएड पूर्ण करुनही शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेतील भावी गुरुजींनी स्वप्नपूर्तीसाठी टीईटीची परीक्षा दिली. मात्र, त्या प्रश्‍नपत्रिकेतील चुकांमुळे त्यांची चिंता वाढली आणि काहींनी अंदाजे उत्तर लिहीले तर काहींनी उत्तरच लिहीले नाही. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर प्रत्येक विषयांतील त्रुटी पडताळणीसाठी किमान चार तज्ज्ञ नियुक्‍त करण्यात आले. त्यांच्या माध्यमातून अंतिम उत्तरसूची तयार करुन त्यावर विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवण्यास सांगितले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवले असून 20 फेब्रुवारीपर्यंत त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. त्रुटी असलेले प्रश्‍न वगळून उर्वरित गुणावरुन निकाल जाहीर केला जाणार आहे. 15 मार्चपूर्वी टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर होईल, असे नियोजन शिक्षण परिषदेने केले आहे. 


ठळक बाबी... 

  • टीईटी परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिकेतील त्रुटी पडताळणीसाठी 45 तज्ज्ञांची नियुक्‍ती 
  • परीक्षेतील 150 प्रश्‍नांपैकी नऊ प्रश्‍न रद्दचा निर्णय : विद्यार्थ्यांकडून मागविले आक्षेप 
  • राज्यातून सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांनी नोंदवले आक्षेप : अंतिम उत्तरसूची तयार 
  • गुण वाढवून द्यायचे की प्रश्‍नच रद्द करायचा, तज्ज्ञ घेणार निर्णय 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT