Tur 
सोलापूर

जिल्ह्यात नऊ तूर खरेदी केंद्रे मंजूर ! ऑनलाइन नोंदणी सुरू; मिळणार सहा हजार रुपये दर 

प्रमोद बोडके

सोलापूर : केंद्र शासनाने निश्‍चित केलेल्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत जिल्ह्यात नऊ तूर खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. 28 डिसेंबरपासून एनईएमएल (NEML) पोर्टलवर तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी भास्कर वाडीकर यांनी दिली. खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या उच्च प्रतीच्या (FAQ) तुरीला प्रति क्विंटल सहा हजार रुपये दर देण्यात येणार आहे. 

तूर उत्पादक शेतकऱ्याकडे ऑनलाइन नोंदणीसाठी सात - बारा उतारा (त्यावर तूर पिकाची नोंद असणे आवश्‍यक आहे), आधार कार्ड, बॅंक पासबुकची झेरॉक्‍स (बॅंक अकाउंट नंबर व आयएफएससी कोड असावा) या कागदपत्राची आवश्‍यकता आहे. खरेदी केंद्रासमोर दर्शविलेल्या तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी. तूर खरेदीस सुरवात झाल्यानंतर शेतकऱ्यांना एसएमएस आल्यानंतरच तूर स्वच्छ करून वाळवून उच्च प्रतीच्या दर्जाची तूर खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावी. जास्तीत जास्त तूर उत्पादक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. भास्कर वाडीकर यांनी केले आहे. 

ही आहेत तूर खरेदी केंद्रे 

  • संत दामाजी शेती व साधन पुरवठा सहकारी संस्था मर्यादित, मंगळवेढा (सोलापूर) 
  • संत दामाजी शेती व साधन पुरवठा सह. संस्था, मंगळवेढा (अक्कलकोट) 
  • विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या. दुधनी (अक्कलकोट) 
  • तुळजाभवानी कृषी व साधन पुरवठा सह. संस्था मर्या, उंबरगे, बार्शी 
  • कृषी उत्पन्न बाजार समिती, कुर्डुवाडी 
  • तालुका खरेदी - विक्री संघ, मंगळवेढा 
  • विठ्ठल सर्वसाधारण सहकारी संस्था मर्या. मांगी 
  • विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या. अनगर 
  • भाळवणी कृषी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लि., भाळवणी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: कसोटीबाबत तळमळ; पण... टी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवचे पारंपरिक क्रिकेटबाबत मत

Shri Guru Paduka Darshan Mahotsav : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्कंठा,स्वामी स्वरूपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्‍घाटन, गुरू श्री एम यांचे रविवारी व्याख्यान

Latest Marathi News Live Update : माहिममधील सेंट झेवियर्स कॉलेज बॉम्बने उडवून देण्याची धमकी

नाटक सुरु असताना अस्ताद काळे प्रेक्षकावर का भडकला? नाटक मध्येच थांबवून चांगलंच सुनावलं

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

SCROLL FOR NEXT