Corona Esakal
सोलापूर

शहर कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर ! ग्रामीणमध्ये टेस्टिंग कमी !

सोलापूर शहरातील दहा प्रभागांमध्ये दोन दिवसांत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही

तात्या लांडगे

जिल्ह्यातील 90764 पुरुष तर 59 हजार 629 महिला आतापर्यंत कोरोना बाधित झाल्या. समाधानाची बाब म्हणजे शहरातील दहा प्रभागांत दोन दिवसांपासून एकही रुग्ण आढळला नाही.

सोलापूर : कोरोनाच्या (Corona) पहिल्या व दुसऱ्या लाटेत शहर- जिल्ह्यातील 90 हजार 764 पुरुषांना तर 59 हजार 629 महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. शहरातील संसर्ग कमी होत असतानाच ग्रामीणमधील रुग्णसंख्या व मृत्यूदराने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. आज शहरात 27 रुग्ण वाढले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीणमध्ये 801 रुग्ण वाढले असून 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (No corona-infected patient was found in two days in ten wards of Solapur city)

ग्रामीण भागातील कोरोनाचा (Covid-19) संसर्ग कमी करण्याच्या उद्देशाने दररोज सरासरी दहा हजारांहून अधिक संशयितांची कोरोना टेस्ट केली जात होती. मात्र, मागील काही दिवसांपासून रुग्ण व मृत्यू वाढत असतानाही टेस्टचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. आज ग्रामीणमध्ये सात हजार 638 संशयितांची टेस्ट करण्यात आली असून शहरात दोन हजारही टेस्ट झालेल्या नाहीत. सद्य:स्थितीत ग्रामीणमध्ये एक लाख 22 हजार 263 रुग्ण आढळले असून दोन हजार 564 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात आतापर्यंत 28 हजार 130 रुग्ण आढळले असून एक हजार 364 जण दगावले आहेत.

दरम्यान, शहरातील 16 हजार 659 पुरुषांना तर 11 हजार 471 महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ग्रामीणमध्ये 74 हजार 105 पुरुष तर 48 हजार 158 महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. ग्रामीणमध्ये आज अक्‍कलकोट तालुक्‍यात 28, बार्शीत 134, सांगोल्यात 39 रुग्ण वाढले आहेत. तसेच करमाळ्यात 92, माळशिरसमध्ये 174, मंगळवेढ्यात 33 रुग्ण वाढले असून त्याठिकाणी प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर माढ्यात 132, उत्तर सोलापुरात सहा आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यात 23 रुग्ण वाढले असून या तालुक्‍यातील प्रत्येकी तिघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मोहोळ तालुक्‍यात 26 तर पंढपुरात 114 रुग्ण वाढले असून दोन्ही तालुक्‍यातील प्रत्येकी चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरातील दहा प्रभागांत दोन दिवसांपासून नाही रुग्ण

शहरात आज 27 रुग्ण आढळले असून 61 जण बरे होऊन घरी गेले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, शहरातील एकूण 26 प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक एक, चार, आठ, 11, 12, 14, 15, 17, 20 आणि 21 मध्ये मागील दोन दिवसांपासून एकही रुग्ण आढळलेला नाही. आज प्रभाग क्रमांक 24 मध्ये सर्वाधिक सहा तर प्रभाग क्रमांक 16 आणि 23 मध्ये प्रत्येकी चार रुग्ण वाढले आहेत. नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन केल्याने शहर कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर येत असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT