No entry in to Karmala without the pass of the Superintendent of Police 
सोलापूर

पोलिस अधीक्षकांच्या पासशिवाय करमाळ्यात प्रवेश नाही 

अण्णा काळे

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा तालुक्‍याच्या वेशीवर कोरोना व्हायरस आला आहे. त्यामुळे प्रशासन अतिशय सतर्क झाले आहे. याबाबत तालुक्‍याच्या सीमेवर बंदोबस्त वाढवला असून कोणीही येथून येणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. पुणे जिल्ह्यातील भिगवण स्टेशन येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने पश्‍चिमेकडील सर्व गावांनी दक्षता घेण्याच्या सूचना करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी दिल्या आहेत. पोलिस अधीक्षकांचा पास असल्याशिवाय येथून कोणालाही प्रवेश देऊ नये असा आदेश त्यांनी दिला आहे. 
पोलिस निरीक्षक पाडुळे म्हणाले, भिगवण स्टेशन येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. भिगवण स्टेशन ते कोंढारचिंचोली (ता. करमाळा) हे अंतर फक्त साडेसहा किलोमीटर आहे. सरकारच्या आदेशानुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळतो त्या ठिकाणापासून तीन ते सात किलोमीटर दरम्यानचा परिसर बफर झोन म्हणून जाहीर केला जातो. भिगवण स्टेशनपासून कोंढारचिंचोली हे गाव साडेसहा किलोमीटरवर असल्याने बफर झोनमध्ये येत आहे. त्यामुळे कोंढारचिंचोली येथील डिकसळ पुलावरून जाणारी-येणारी वाहतूक अत्यंत कडक केली आहे. अतिअत्यावश्‍यक असल्यासच बाहेर सोडावे. याशिवाय पोलिस अधीक्षकांचा पास असल्याशिवाय प्रवेश देऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT