solapur cp office
solapur cp office sakal
सोलापूर

पूर्णवेळ अधिकारी नाही! सोलापूर पोलिस आयुक्तालयातील महिला सुरक्षा कक्षाकडून विवाहितांना मिळेना ‘भरोसा’

तात्या लांडगे

सोलापूर : हुंडा दिला नाही, विवाहात मानपान केला नाही, कर्ज फेडायला माहेरून पैसे आण अशा विविध कारणांतून विवाहितांच्या छळाचे प्रमाण वाढले आहे. तुटू लागलेला संसार पुन्हा सुखाने चालावा, यासाठी न्याय मिळेल म्हणून मोठ्या विश्वासाने विवाहिता पोलिस आयुक्तालयातील महिला सुरक्षा कक्षात (भरोसा सेल) धाव घेतात. पण, सद्य:स्थितीत सोलापूर पोलिस आयुक्तालयात तेथे वरिष्ठ अधिकारच नाही. कर्मचारी देखील खूपच कमी असल्याने दीडशेहून अधिक अर्ज प्रलंबित असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोरोना काळातील निर्बंधात सलग दीड-दोन वर्षे निर्बंधच होते. त्या काळात शाळा-महाविद्यालये देखील बंद होती. त्यावेळी अनेक पालकांनी घरी असलेल्या मुलींचे विवाह उरकले. खर्च कमी होईल, मुलीला चांगले सासर मिळाल्याच्या भावना त्यामागे होत्या. पण, मागील काही महिन्यांपासून कौटुंबिक छळाच्या तक्रारी खूपच वाढल्याची स्थिती आहे.

सोलापूर शहर-ग्रामीणमध्ये दरमहा सरासरी १६० तक्रारी दाखल होत आहेत. महिला सुरक्षा कक्षातील (भरोसा सेल) अधिकारी व अंमलदारांच्या मध्यस्थीने तथा त्यांच्या समुपदेशनामुळे अनेकांचे तुटण्याच्या उंबरठ्यावरील संसार पुन्हा सुखाने सुरु झाले ही देखील वस्तुस्थिती आहे. परंतु, सोलापूर पोलिस आयुक्तालयातील महिला सुरक्षा कक्षाच्या पोलिस निरीक्षक विजया कुर्री यांची पदोन्नतीने सोलापूर ग्रामीणमध्ये पोलिस उपअधीक्षकपदी नेमणूक झाली आहे.

दुसरीकडे तेथील सहायक पोलिस निरीक्षक ज्योती कडू यांची बदली एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तेथील दुसऱ्या महिला पोलिस उपनिरीक्षक रजेवर आहेत. त्यामुळे महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला भरोसा सेल वरिष्ठ अधिकाऱ्यांविनाच सुरू असल्याची स्थिती आहे.

पंखे तर बंद करायला हवेत...

दोन दिवसांपूर्वी महिला सुरक्षा कक्षात गेल्यावर त्या कार्यालयात कोणीच नव्हते. पण, तेथील दोन्ही पंखे सुरु होते. पुढील हॉलमध्ये अवघ्या दोनच महिला अंमलदार होत्या. अप्पर पोलिस अधीक्षकांच्या बंगल्यासमोरून या कक्षाला ये-जा करायला दरवाजा आहे. त्यामुळे कोण कधी येते आणि कधी जाते याचा थांगपत्ता लागत नसल्याची स्थिती त्यावेळी पहायला मिळाली. अतिशय संवेदनशील विषयांवर काम करणाऱ्या या भरोसा सेलवर कौटुंबिक छळ झालेल्या महिलांचा खूप विश्वास आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने या बाबींकडे गांभीर्याने पाहतील, असा सर्वांनाच विश्वास आहे.

‘सायबर’ला देखील पूर्णवेळ अधिकारी नाही

सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शौकतअली सय्यद हे दोन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर या विभागाचा पदभार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल दोरगे यांच्याकडे सोपविला आहे. पण, सध्या ते सेवाअंतर्गत प्रशिक्षणासाठी बाहेर असल्याने गुन्हे शाखेचा पदभार आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरठ यांच्याकडे आहे. सायबर पोलिस ठाण्याचा कारभार सध्या एकाच पोलिस उपनिरीक्षकावर सुरु असल्याची स्थिती आहे.

घटस्फोटाचे प्रमाण वाढल्याची चिंता
विवाहापूर्वी पाहिलेल्या स्वप्नांचा काही महिन्यातच चक्काचूर होतो. सासरच्यांकडून होणारा सततचा छळ, हुंड्यासाठी तगादा, चारित्र्यावर संशय, मोलकरणीसारखी कामे लावणे, घालून- पाडून बोलणे, शिवीगाळ व मारहाण, याला कंटाळून विवाहिता मदतीसाठी पोलिसांत धाव घेतात. त्यावेळी त्यांना काही दिवसांत न्याय अपेक्षित असतो. काहीवेळा त्यासाठी विलंब होतो आणि डोक्यात विभक्त होण्याचा विचार सुरु होतो. त्यावेळी ते प्रकरण कौटुंबिक न्यायालयापर्यंत पोचते. दरमहा सरासरी २० प्रकरणे कौटुंबिक न्यायालयात दाखल होत असून अनेकांनी घटस्फोट घेतला आहे. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या स्तरावरच समजूत काढून भांडण मिटविण्याचा प्रयत्न झाल्यास तेढ वाढणार नाही, असे काहींचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT