sarpanch 
सोलापूर

थेट सरपंच निवड रद्दचा अध्यादेशच नाही ! निवडणुकीची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच 

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील महाविकास आघाडीने भाजप सरकारचा थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द केला. मात्र, त्याबाबत जिल्हाधिकारी स्तरावरील निवडणूक शाखेला काहीच अध्यादेश प्राप्त झाला नसल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. आता जुलै ते डिसेंबर 2020 पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निकालाची प्रक्रिया सुरु झाली असून तहसीलदार स्तरावरुन प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती मागविल्या आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 659 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 


जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत करमाळा तालुक्‍यातील 51, माढ्यातील 82, बार्शीतील सर्वाधिक 96, उत्तर सोलापुरातील 24, मोहोळमधील 77, पंढरपुरातील 72, माळशिरसमधील 49, सांगोल्यातील 61, मंगळवेढ्यातील 23, दक्षिण सोलापुरातील 52 आणि अक्‍कलकोट तालुक्‍यातील 72 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. या पार्श्‍वभूमीवर 20 जानेवारीपासून गावचे नकाशे अंतिम करणे, ग्रामसेवक व तलाठ्यांमार्फत स्थळ पाहणी करणे, प्रारुप प्रभाग रचनेला मान्यता, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दुरुस्ती करुन प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द करणे, आरक्षण सोडतची तयारी, प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती मागविणे असा कार्यक्रम पार पडला आहे. आता प्राप्त हरकतींवर प्रातांधिकाऱ्यांमार्फत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. 21 मार्चपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला मान्यता दिली जाणार आहे. मात्र, अद्याप थेट सरपंच निवडीबद्दल शासन स्तरावरुन काहीच प्राप्त न झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. 


अध्यादेश नसल्याने पूर्वीच्या निर्णयानुसारच प्रक्रिया 
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा मोठा टप्पा जुलै ते डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. तत्कालीन सरकारने थेट सरपंच निवडीचा निर्णय घेतला मात्र, महाविकास आघाडीने तो निर्णय रद्द केला. या पार्श्‍वभूमीवर आता होणाऱ्या या टप्प्यात थेट सरपंच निवडला जाणार की, बहूमतातून सरपंच निवड होणार, असा प्रश्‍न विद्यमान सरपंच व सदस्यांकडून निवडणूक शाखेला विचारला जावू लागला आहे. मात्र, शासनाकडून याबाबत कोणताही अध्यादेश आला नसल्याने तुर्तास पूर्वीच्या नियमांनुसारच प्रक्रिया राबविली जात असल्याचे उत्तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

SCROLL FOR NEXT