सोलापूर

अक्कलकोटमध्ये आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अक्कलकोट शहरात व तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. आज आलेल्या अहवालामध्ये अक्कलकोट शहरातील मुजावर गल्लीत एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बाधित रुग्णांची संख्या 149 इतकी झाली आहे. त्यामध्ये 91 पुरुष व 58 स्त्रियांचा समावेश आहे. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज एकूण 12 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 11 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मुजावर गल्ली अक्कलकोट येथील एक स्त्री पॉझिटिव्ह आढळून आली आहे. तिला सारीची लागण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 69 जण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत. अद्यापही 69 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अक्कलकोट व बार्शी या दोन तालुक्‍यात प्रत्येकी 22 रुग्ण आढळून आले आहेत. तर दक्षिण सोलापूर तालुक्‍यात सर्वाधिक 68 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 149 जण कोरोना बाधित झाले आहेत. 


 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईला रेड अलर्ट! कर्मचाऱ्यांनो 'वर्क फ्रॉम होम' करा, बाहेर पडू नका; BMCकडून आवाहन

Pune Flood: इंद्रायणीला पूर, आळंदीत २५० वारकऱ्यांचे स्थलांतर; पूल पाण्याखाली... कठडे अन् चेंजिंग रूम वाहून गेल्या, दुकानांसह घरांमध्ये पाणी

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई दरम्यानची एसटी वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार

Mumbai Rain : मुंबईतील पावसाचा फटका लोकल सेवेला; तिन्ही मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनिटं उशीराने...

Pune Rain : मावळमध्ये पावसाचे रौद्र रुप ! पुणे-मुंबई महामार्गावर टेम्पो चालकासह वाहून गेला, NDRF ने खासगी बसमधील ३७ जणांचे वाचवले प्राण

SCROLL FOR NEXT