सोलापूर

सोलापूर महापालिकेतील 30 आरोग्य निरीक्षकांना नोटीस 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रस्त्यावर थुंकणाऱ्यास एक ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार महापालिकेने प्रसिद्धीकरणही दिले. मात्र, गेल्या 15 दिवसांत महापालिकेच्या पथकाला एवढ्या मोठ्या शहरात एकही रस्त्यावर थुंकणारा सापडला नाही का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या संदर्भात "ई-सकाळ'वर "आरोग्य मंत्र्यांचा आदेश स्मार्ट सिटीच्या "डस्टबीन'मध्ये' ही बातमी प्रसिद्ध झाली. आयुक्त पी. शिवशंकर यांनी या संदर्भात तातडीने दखल घेऊन तब्बल 30 आरोग्य निरीक्षकांना नोटीस बजावली आहे. 

वाचा मूळ बातमी - आरोग्यमंत्र्यांचा आदेश डस्टबीनमध्ये 

सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर थुंकणे किंवा सिगारेटचा झुरका घेणे स्मार्ट सोलापूरकरांना भलतेच महाग पडणार आहे. थुंकणे आणि झुरका घेण्याचा गुन्हा तीन वेळेला करणाऱ्या व्यक्तींना तब्बल पाच हजार रुपये दंड आणि पाच दिवस सार्वजनिक सेवा करावी लागणार आहे. त्यानुसार गेल्या 15 दिवसांत नियम मोडणाऱ्या एका तरी नागरिकावर कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र ही कारवाई झाली नाही. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता, सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून त्याचा एक भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावणे, फळ व भाजी विक्रेते यांनी मास्क व हॅंडग्लोव्हज वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, दुकानदार, व्यावसायिकांनी मास्क व हॅंडग्लोव्हज न वापरणे, अशा बाबींसाठी वेगवेगळी दंडात्मक रक्कम निश्‍चित करून कारवाई करण्यात येत असल्याचे आदेश प्रसारित करण्यात आले असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध आरोग्य निरीक्षक यांनी कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत. त्यानुसार काही आरोग्य निरीक्षकांनी नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई केली नसल्याचे निदर्शनास आल्याने आयुक्त पी. शिवशंकर यांनी 30 आरोग्य निरीक्षकांना नोटीस बजावलेली आहे व 24 तासांमध्ये खुलासा मागितलेला आहे. 

यांना बजावली नोटीस 
जितेंद्र मोरे, मुकेश बद्दूरकर, सतीश पाटील, विजय साळुंखे, उमर सय्यद, बच्चू नरसिंग, श्री. हिरोळी, श्री. धरणे, श्री. भोसले, श्री. गवळी, श्री. खमितकर, श्री. व्हनमाने, मुबारक शेख, डी. सी. जगदाळे, संग्राम पाटील, डी. एम. परांडेकर, रिझवान पटेल, आर. जी. मालखरे, सचिन वडवेराव, पांडुरंग कंदी, अक्षय चव्हाण, विलास कदम, उमेश मंगळूरकर, विठोबा शिंदीबंदे, पवन वाघमारे, वनारोटे, श्री. अरब, श्री. बागेवाडी, वंदना कांबळे, आय. जी. बिराजदार, डी. एस. म्हेत्रे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT