Now coaching classes are also online 
सोलापूर

आता कोचिंग क्‍लासेसही ऑनलाइन

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोना पार्श्‍वभूमीवर मागील अडीच महिन्यांपासून लॉकडाउन आहे. त्याचबरोबर कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये यासाठी सरकारने संचारबंदी केली होती. मात्र, आता लॉकडाउन आनलॉक केले तरी शाळा, कोचिंग क्‍लासेस उघडण्यास अजून परवानगी नसल्याने सध्या खासगी कोचिंग क्‍लासेस चालकांनी ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी सुरवात केली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात बदल होण्याची शक्‍यता आहे. 
ऑनलाइन शिक्षण पद्धतीने घरातच विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळेल.

विद्यार्थ्यांना योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. आजपर्यंत विद्यार्थी एका चौकटीत शिक्षण घेता होते; मात्र ऑनलाइनने हे क्षेत्र व्यापक झाले आहे. दुसरीकडे सध्याच्या ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवाद कमी झाला आहे. एखादा विषय विद्यार्थ्यांसमोर असल्यास त्यांना जसे समजते तसे शिकविता येते, ते ऑनलाइनमुळे शक्‍य नाही. ऑनलाइनद्वारे शिक्षकांनी शिकवलेले सगळ्याच विद्यार्थ्यांना समजतेच असे नाही. विद्यार्थी समोर असल्यास त्याच्या बॉडी लॅंग्वेजनुसार शिकवलेले समजते का नाही ते कळते. 

बदल स्वीकारणे गरजेचे
विद्यार्थ्यांसोबत संवाद होणे गरजेचे आहे. मात्र, कोरोनासारख्या महामारीने शिक्षण क्षेत्रात जो बदल होतोय तो स्वीकारणे गरजेचे आहे. मात्र, वर्गात शिकवताना विद्यार्थ्यांना शिकवलेले कळत का नाही हे त्यांच्या बॉडी लॅंग्वेजनुसार कळते; मात्र ऑनलाइन शिकवताना लक्षात येत नाही. 
- श्रुती बागेवाडी, मुख्याध्यापिका, मेहता प्रशाला 

डोळ्यांना हानीकारक

ऑनलाइन डोळ्यांना हानिकारक आहे. समोर असल्यास विद्यार्थ्यांना दोन ते चार पद्धतीने शिकवता येते. मात्र, ऑनलाइन शिक्षण पद्धतीत अशा प्रकारे शिक्षण देता येत नाही. ऑनलाइन शिक्षण पद्धत जास्त काळ टिकेल याबाबत शंका आहे. 
- सुशांत माळवे, लॉजिक कोचिंग क्‍लासेस 

घरबसल्या चांगले शिक्षण मिळेल

कोरोनाने शिक्षण पद्धतीत बदल होत आहे. डिजिटल स्कूल तयार करण्यासाठी नवीन व्यासपीठ तयार होत आहे. त्यामुळे आयटी क्षेत्राला अच्छे दिन येतील. घरबसल्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळेल. 
- ज्योती तरंगे, आयटीक्षेत्रातील तज्ज्ञ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT