video conference 
सोलापूर

आता शेतकरी महिलांचीही गूगल मीटद्वारे मीटिंग ! उमेद व राज्य अभियान कक्षाने साधला संवाद 

बापूराव गावडे

सावळेश्वर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला उत्पादक संघातील महिलांशी गूगल मीटद्वारे संवाद साधण्यात आला. हा संवाद केंद्र शासनाचे उमेद व राज्य अभियान कक्षाने साधला. 

यामध्ये सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील उत्पादक संघांची दखल घेत स्वयं शिक्षण प्रयोग या कार्यालयाने आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये उमेद राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पाचे योगेश भामरे, राज्य अभियान व्यवस्थापक प्रेमा गोपालन यांनी सोलापूर व उस्मानाबाद येथे उमेद अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कृषी कन्या भाजीपाला उत्पादक संघ (मोहोळ), निसर्ग उत्पादक संघ (बार्शी), हिरकणी महिला उत्पादक संघ (तुळजापूर), नारी शक्ती उत्पादक संघ (उस्मानाबाद), जागृती महिला उत्पादक संघ (लोहारा), वसुंधरा उत्पादक संघ (वाशी), महालक्ष्मी उत्पादक संघ (कळंब) या संघातील महिला सदस्या, अध्यक्ष सचिव यांच्याशी झूम मीटद्वारे हा संवाद साधला. 

भाजीपाला उत्पादक संघ स्थापन करताना महिलांना कोणत्याही प्रकारचे अर्थसाह्य न करता महिलांनी उभारलेल्या कार्याचे प्रेमा गोपालन यांनी कौतुक केले. तसेच संघ उभारणीत योगेश भामरे यांनी महिलांना केलेले मार्गदर्शन तसेच आलेल्या अडचणींवर कशा प्रकारे मात करून संघ यशस्वीपणे उभारले याची माहिती दिली. भविष्यात हे संघ राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत मोठ्या शेतकरी कंपनीमध्ये परिवर्तन करण्यासाठी उमेद अभियानकडून आज संघातील प्रत्येक उत्पादक गटांना उमेद अंतर्गत दोन लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्‍वासन सोलापूर व उस्मानाबाद येथील जिल्हा अभियान कक्ष उमेदमार्फत संघांना देण्यात आले. 

सोलापूर जिल्ह्यातील कृषी कन्या भाजीपाला उत्पादक संघांशी गूगल मीटची संकल्पना व कार्य श्री. भामरे व प्रेमा गोपालन यांची होती. कार्यशाळेस मीनाक्षी मडवळी, उपमन्यू पाटील, तबस्सुम मोमीन, बाळासाहेब काळदाते, माधव गोरकट्टे, टी. डी. नावडकर, दत्तात्रय सोट उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Subsidy : 'एलपीजी सबसिडी' बंद होणार?; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

Pune Election: सेम टू सेम आर्ची! पुण्याच्या निवडणुकीत आर्चीसारखी दिसणारी उमेदवार कोण?

Pune Political : सूत्रे हलली, रात्रीत चित्र बदलले; कोथरूडमध्ये भाजपकडून ‘डॅमेज कंट्रोल’, उमेदवारांची फेररचना!

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगरमध्ये चुरशीची तिरंगी लढत

Latur Crime : अहमदपूर तहसील कार्यालयात बनावट सह्या, शिक्के वापरून फसवणूक; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT