janavarncha chara.jpg 
सोलापूर

कोरोना: बसायला आडवत नाहीत, पण गिऱ्हाईकच येईना 

सुस्मिता वडतिले

सोलापूर : आम्हाला बसायला कुणी अडवत नाही, पण गिऱ्हाईकच येईना... मारायला लागलेती धडाधडा, मग कसं करणारं... सकाळपारी काही थोडी लोक येतात... पण परत कुणी येतचं न्हाय चारा न्यायला. जनावरांना चारा न्यायला परवानगी हायं म्हणत्यात, पण येताना मोकळेच यावं लागतं. मग त्यांना हानत्यात. या भितीने गिऱ्हाईक येईना मग आम्ही काय करणार.., अशी व्यथा चारा विकरणाऱ्या माया काळुंके या वृद्ध महिलेनी "सकाळ'कडे मांडली. 
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे बाहेर फिरु नका, घरातच बसा असं आवाहन सरकारने केले आहे. अत्यावश्‍यक सेवांसाठी घराबाहेर पडण्यासाठी परवानगी दिली जात आहे. मात्र, कोरोनाने घातलेल्या धूमाकुळमुळे सध्या सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. संचारबंदीळे सर्व दुकाने, एसटी स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, पेट्रोलपंप बंद आहेत. नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. परंतु ज्यांचे पोट हातावर आहे, त्यांनी कसे राहायचे... कसे जगायचे... असा प्रश्‍न त्यांना सतावत आहे. अशा स्थिती जनावारांचा चारा विकण्यासाठी परवानगी सरकारने दिली आहे. त्यामुळे बाराइमान चौकात नेहमीप्रमाणे जनावरांचा चारा विकणारे विक्रेते बसत आहेत. मात्र, त्यांचकडे गिऱ्हाईकांनी पाठ पिरवली आहे. काळुंके म्हणाल्या, आठ दिवसांपूर्वी होते तेवढे गिऱ्हाईक आता नाही. कोरोनाच्या धास्तीने गिराईक येईना. जे नेहमी चारा नेण्यासाठी लोक येत होते त्यांना विचारलं तर चारा न्यायला येताना पोलिस मारत असल्याचं सांगत आहेत. 
रक्‍मा वाघमोडे म्हणाल्या, अनेकांनी आपली जनावरे विकली आहेत. ज्यांच्याकडे आहेत ते सुद्धा कोरोनाच्या भितीने चारा नेईला येत नाहीत. मुक्‍या जनारांसाठी तरी सवलत देईला पाहिजे. सवलत दिली म्हटले जातय, पण लोक बाहेर आली की, मारलं जात आहे. त्यामुळे कोणी बाहेर येत नाहीत. 

सध्या निम्यावर उलाढाल 
कोरोनाची भिती नव्हती तेव्हा दिवसाला बाराशे ते तेराशे रुपयाचा व्यवासाय होईचा. मात्र, आता 500 ते 600 रुपयांचा होत आहे. साकळी थोडी लोक येतात पुन्हा कोणी फिरकत नाही. चाऱ्याचे पैशेसुद्धा निघत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 
------  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग लागू होण्यास उशीर? कर्मचाऱ्यांना 3 लाखांचं नुकसान; काय आहे गणित?

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT