उजनी धरण sakal
सोलापूर

आता वरूणराजाचीच प्रतीक्षा! जून संपला, उजनीत आले फक्त सव्वा टीएमसी पाणी

पावसाळ्याचा पहिला महिना (जून) संपला. ३० दिवसांत उजनी धरणात अवघे सव्वा टीएमसी पाणी आले आहे. धरण सध्या मायनस ११ टक्क्यांवर गेले असून सध्या आषाढीसाठी धरणातून नदी, कॅनॉल व भीमा-सीना जोड कालव्यातून एक हजार ७५० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पावसाळ्याचा पहिला महिना (जून) संपला. ३० दिवसांत उजनी धरणात अवघे सव्वा टीएमसी पाणी आले आहे. धरण सध्या मायनस ११ टक्क्यांवर गेले असून सध्या आषाढीसाठी धरणातून नदी, कॅनॉल व भीमा-सीना जोड कालव्यातून एक हजार ७५० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले आहे. आता जुलैमध्ये पावसाची अपेक्षा आहे, अन्यथा जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची व शेती पिकांची आवस्था बिकट होईल, अशी भीती वर्तविली जात आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार जून महिन्यात चांगला पाऊस अपेक्षित होता. पण, बऱ्याच तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेतं यंदा जूनमध्ये कमीच पाऊस झाला आहे. अजूनही पेरण्या खोळंबलेल्याच आहेत. पेरणीसाठी शेतकऱ्यांना जमिनीतील पुरेशा ओलाव्याची प्रतीक्षा आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने बळीराजा आता पावसाची वाट पाहत आहे. पेरणी केलेल्या बियाणांना पाऊस अपेक्षित आहे. धरणाची पाणीपातळी आता मायनस ११ टक्क्यांपर्यंत खाली गेली आहे. मागील ३३ दिवसांतील पावसाने धरणात केवळ एक ते सव्वा टीएमसीपर्यंतच पाणी आले आहे. पुण्यातील पावसामुळेच अनेकदा धरणाने शंभर टक्क्यांची पातळी गाठली आहे. पुणे जिल्ह्यात अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणातील पाणीसाठा मायनसमध्येच जात आहे. आता जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल आणि धरण प्लसमध्ये येण्याची आशा सर्वांनाच आहे. पण, जुलैमध्ये पावसाने ओढ दिल्यास धरणातून नदीद्वारे एक आवर्तन सोडावे लागणार आहे. जेणेकरून शहराचा पाणी पुरवठा सुरळीत राहील आणि शेती, जनावरांचीही तहान भागेल.

ठळक बाबी...

  • भीमा नदीतून एक हजार क्युसेक, कॅनॉलमधून सहाशे, भीमा-सीना जोड कालव्यातून दीडशे क्युसेकने आषाढीसाठी सोडले पाणी

  • उजनीत मायनस ६४ टीएमसी पाणी; मायनस २५ टक्क्यांपर्यंत कॅनॉलमधून पाणी सोडणे शक्य

  • हरीत लवादाच्या निकषांनुसार धरण मायनसमध्ये गेल्यास कॅनॉलमधून सोडता येत नाही पाणी

  • धरण मायनस ५० टक्क्यांपर्यंत गेले, तरीही नदीद्वारे पाणी सोडता येते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Babar Azam च्या कारकीर्दिला पूर्णविराम? पाकिस्तानने संघातून केली हकालपट्टी; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर झाला 'गेम'

Stock Market Today: शेअर बाजारात 22 लाख कोटींचे नुकसान! सलग तिसऱ्या दिवशी बाजार लाल रंगात बंद; कोणत्या सेक्टरला फटका?

Crime: 'तुमच्या आधार कार्डचा वापर करून मनी लाँड्रिंग झालेय’, सरकारी अधिकाऱ्याची फसवणूक; ४९ लाख रुपयांचा गंडा

Latest Marathi News Live Update : आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात मदत जाहीर करा- अन्यथा परीणाम भोगावे लागतील- राजू शेट्टी

T20 WC, IND vs ENG: वानखेडेची खेळपट्टी पाहून गौतम गंभीर क्युरेटरवर संतापला? सेमीफायनलपूर्वी ड्रामा, त्या व्हायरल फोटोमुळे चर्चा

SCROLL FOR NEXT