Corona active 
सोलापूर

शहरात पुन्हा वाढतोय कोरोना ! उपचारासाठी उशिरा दाखल झालेल्या दोघांचा मृत्यू; नव्या 21 रुग्णांची पडली भर 

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली असून आज 357 संशयितांमध्ये 21 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दुसरीकडे 18 डिसेंबरला उपचारासाठी दाखल झालेल्या शेळगी परिसरातील 81 वर्षीय महिलेचा आणि टेळे नगरातील गळफास घेतलेल्या 90 वर्षीय महिलेचाही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. नागरिकांनी मास्क, हॅण्डवॉश, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. 

शहरात आज अवंती नगर, इंदिरा नगर, नम्रता सोसायटी (विजयपूर रोड), लक्ष्मी पेठ (टेळे नगर), मजेरवाडी (सम्राट चौक), पोलिस लाईन (मुरारजी पेठ), शास्त्री हौसिंग सोसायटी (पत्रकार भवनजवळ), इंदिरा नगर, स्वामी विवेकानंद नगर (हत्तुरे वस्ती), आशिवार्द नगर (मजरेवाडी), हौसेकर वस्ती, रेल्वे सोसायटी (भारती विद्यापीठजवळ), कर्णिक नगर, नवी पेठ, अभिषेक अपार्टमेंट (होटगी रोड), व्यंकटेश अपार्टमेंट (दक्षिण सदर बझार) या ठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे. 

रुग्णांच्या संपर्कातील 108 संशयित होम क्‍वारंटाईन आहेत. तर 24 संशयित इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन असून 13 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. आता शहरातील ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या 284 झाली आहे. तत्पूर्वी, शहरात साडेसहाशे ते सातशे संशयितांमध्ये सरासरी 22 ते 30 पर्यंत रुग्ण आढळत होते. मात्र, आता त्यात वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

ठळक बाबी... 

  • आतापर्यंत शहरातील एक लाख 34 हजार 129 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • शहरात आतापर्यंत आढळले दहा हजार 812 व्यक्‍ती पॉझिटिव्ह 
  • शहरातील टेस्टिंग झाले कमी; बाधितांच्या संख्येत होतेय वाढ 
  • आज 357 संशयितांमध्ये आढळले 21 पॉझिटिव्ह; नऊ पुरुष, 12 महिलांचा समावेश 
  • 18 आणि 20 डिसेंबरला दाखल झालेल्या दोन रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा ! शेतकऱ्याची जमीन हडपली, पोलिसांकडे तक्रार करताच सुपारी देऊन हत्या

Gopikishan Bajoria: पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे: माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया; चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश!

Numerology : 'या' 3 मूलांकाच्या मुली असतात सर्वांत जास्त साध्याभोळ्या; साक्षात लक्ष्मीचे रूप बनून बदलतात जोडीदाराचे आयुष्य

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये अशोक खरातचा पीए रमेश हिंगे फरार, SIT कडून शोधमोहीम सुरू

Pune Magarpatta Canal Burst : मगरपट्टा परिसरात कालवा फुटला; 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' पर्यायी मार्ग नक्की पाहून घ्या...

SCROLL FOR NEXT