Corona Update 
सोलापूर

जाणून घ्या तुमच्या तालुक्‍यात आतापर्यंत किती रुग्ण सापडले? आज 326 पॉझिटिव्ह अन्‌ तिघांचा मृत्यू

तात्या लांडगे

सोलापूर : ग्रामीण भागात कोरोनाने आता चांगलाच जम बसवला आहे. दोन हजार 917 संशयितांमध्ये 326 जण पॉझिटिव्ह आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पाच लाख 95 हजार 520 संशयितांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून त्यात 44 हजार 928 जण कोरोना बाधित आढळले आहेत. आतापर्यंत 40 हजार 900 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या दोन हजार 225 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आतापर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागात 31 हजार 542 रुग्ण आढळले असून तालुक्‍यातील शहरी भागात 13 हजार 386 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. दरम्यान, अक्‍कलकोट, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या तालुक्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही आटोक्‍यात आहे. मात्र बार्शी, करमाळा, माळशिरस, पंढरपूर, सांगोला या तालुक्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. 

आज अक्‍कलकोट तालुक्‍यात चार, बार्शीत सर्वाधिक 90, करमाळ्यात 52, माढ्यात 19, माळशिरसमध्ये 39, मंगळवेढ्यात 21, मोहोळ व उत्तर सोलापूर तालुक्‍यात प्रत्येकी चार, पंढरपूर तालुक्‍यात 33 तर सांगोल्यात 60 नवे रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे आतापर्यंत पंढरपूर, बार्शी, माळशिरस, माढा, मोहोळ या तालुक्‍यांत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. 

आतापर्यंतचे तालुकानिहाय रुग्ण (कंसात ऍक्‍टिव्ह रुग्ण) 

  • अक्‍कलकोट : 1,375 (83) 
  • बार्शी : 8,092 (853) 
  • करमाळा : 3,471 (476) 
  • माढा : 4,932 (254) 
  • माळशिरस : 8,055 (322) 
  • मंगळवेढा : 1,972 (96) 
  • मोहोळ : 2,162 (114) 
  • उत्तर सोलापूर : 906 (51) 
  • पंढरपूर : 8,786 (343) 
  • सांगोला : 3,411 (157) 
  • दक्षिण सोलापूर : 1,766 (54) 
  • एकूण : 44,928 (2,803) 

ठळक बाबी... 

  • जिल्ह्यातील दहा तालुक्‍यांत वाढले 326 रुग्ण; तिघेजण कोरोनाचे ठरले बळी 
  • ग्रामीण भागात आढळले 197 तर शहरी भागात 197 रुग्ण; दक्षिण सोलापुरात एकही रुग्ण नाही 
  • अनगर (ता. मोहोळ), मोरवड (ता. करमाळा) आणि कन्हेरगाव (ता. माढा) येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू 
  • रुग्णसंख्या 45 हजारांच्या उंबरठ्यावर; मृतांची संख्या एक हजार 225 
  • ग्रामीण भागात नियमांचे उल्लंघन सर्वाधिक; दोन हजार 803 रुग्णांवर सुरू आहेत उपचार 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT