Corona Upadate 
सोलापूर

शहर-जिल्ह्यात लॉकडाउन अटळ ! आज आढळले 601 रुग्ण आणि सात जणांचा मृत्यू

तात्या लांडगे

सोलापूर : शहरात आज 210 जण कोरोना बाधित आढळले आहेत. त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 46 ते 79 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. शहरातील रुग्णसंख्या आता 15 हजार 415 झाली असून त्यातील 710 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या दोन हजार 289 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज शहरातील संशयितांच्या कोरोना टेस्टने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. एकूण दोन लाख 931 संशयितांची टेस्ट करण्यात आली आहे. 

विशेष म्हणजे होम क्वारंटाइनमध्ये 22 हजार 368 संशयित आहेत. दुसरीकडे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनवर भर देण्याचे जाहीर करूनही इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये एकही संशयित नसल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागातील पाच लाख 92 हजार 414 संशयितांची आतापर्यंत कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत 44 हजार 60 कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण रुग्णांपैकी एक हजार 222 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून सध्या दोन हजार 631 रुग्णांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात दररोज साडेचार ते सव्वापाच हजार संशयितांची टेस्ट केली जात आहे. जिल्ह्यात विनामास्क तथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर बार्शी, माढा, माळशिरस, पंढरपूर या तालुक्‍यांमध्ये रुग्णसंख्या वाढू लागली आहे. आज (रविवारी) अक्कलकोट तालुक्‍यात पाच, बार्शीत 128, करमाळ्यात 37, माढा 86, माळशिरस 53, मंगळवेढ्यात सात, उत्तर सोलापुरात चार, मोहोळ तालुक्‍यात 14, पंढरपूर तालुक्‍यात 49, सांगोला तालुक्‍यात पाच तर दक्षिण सोलापूर तालुक्‍यात तीन रुग्ण वाढले आहेत. बार्शी, पंढरपूर या तालुक्‍यातील ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात रुग्ण वाढू लागले आहेत. कारवाया करूनही आणि निर्बंध घालूनही कोरोना कमी होत नसल्याने प्रशासन चिंतेत पडले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या हेतूने आगामी काळात प्रशासन ठोस निर्णय घेऊ शकते, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. 

उपचार घेणारे तालुकानिहाय रुग्ण 
तालुका व ऍक्‍टिव्ह रुग्ण 

  • अक्कलकोट : 79 
  • बार्शी : 775 
  • करमाळा : 443 
  • माढा : 304 
  • माळशिरस : 304 
  • मंगळवेढा : 76 
  • उत्तर सोलापूर : 116 
  • मोहोळ : 47 
  • पंढरपूर : 325 
  • सांगोला : 100 
  • दक्षिण सोलापूर : 62 
  • एकूण : 2,631 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC Budget 2026 : पीएमपी तिकिटात ज्येष्ठांना ५०% सवलत, महिलांसाठी खास योजना; पुणे महानगरपालिकेचा १५ हजार ६६९ कोटींचा अर्थसंकल्प सादर

IPL 2026 Marathi News: लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेला 'तो' यंदा RCB चा भाग नाही; फ्रँचायझी म्हणते, त्याच्यासोबतचा करार...

गौतमीच्या गळ्यात 'कोणाच्या' नावाची साखळी, नेटकऱ्यांनी काढलं शोधून, म्हणाले...'आयुष्यात कोणाची एन्ट्र्री झाली की...'

Latest Marathi News Live Update : दीपक केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडीत मोर्चा

Numerology : 'या' 5 मुलांकाचे लोक कटकारस्थान करून बिघडतात दुसऱ्याचं आयुष्य, समोर चांगले वागून सोयऱ्यांच्याच पाठीत खुपसतात खंजीर

SCROLL FOR NEXT