सोलापूर : शहरातील बॉईज, वाडिया हॉस्पिटलशिवाय 34 खासगी हॉस्पिटल्समध्ये कोरोना बाधितांवर उपचार केले जातात. रुग्णसंख्या वाढू लागल्याने बेड अपुरे पडत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आणखी चार खासगी हॉस्पिटल्समध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.
शहरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये 140, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 220, सीएनएस हॉस्पिटलमध्ये 110, मार्कंडेय रुग्णालयात 105, यशोधरा हॉस्पिटल, गंगामाई, स्पर्श न्यूरो हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी 100 बेड्स, तर सिटी हॉस्पिटलमध्ये 60, बळवंत इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोमध्ये 50 तर एस. एस. बलदवा हॉस्पिटलमध्ये 40 आणि एस. पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्समध्ये 30, लोकमंगल जीवक व कोणार्क हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी शंभर बेड्स उपलब्ध असून, लाईफलाइन, नर्मदा मल्टि सुपरस्पेशालिटी, स्पॅन, डॉ. रिझवान्स् अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, युंगधर, डॉ. चिडगूपकर, धनराज गांधी, डॉ. रघोजी किडनी हॉस्पिटल, शिंदे मल्टि स्पेशालिटी या रुग्णालयांमध्ये प्रत्येकी 50 बेड्स कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दुसरीकडे, नवनीत हॉस्पिटलमध्ये 45, ईएसआय हॉस्पिटल व रेल्वे हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी 40, जय हॉस्पिटलमध्ये 38 तर अल-फैज चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये 22 बेड्स यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
आता फोनिक्स (सोन्या मारुतीजवळ) हॉस्पिटलमध्ये 10, बालाजी हॉस्पिटल, केअर मल्टि स्पेशालिटीमध्ये प्रत्येकी 20 तर हृदयम हॉस्पिटलमध्येही (जुने रघोजी हॉस्पिटल) 20 बेड्सची सोय केली जाणार आहे. तत्पूर्वी, कृष्णा हॉस्पिटल (जोडभावी पेठ) आणि हृदयम, श्रीराम हार्ट ऍण्ड आय केअर हॉस्पिटलमध्ये प्रत्यकी 20 तर नान्नजकर हॉस्पिटलमध्ये दहा बेड वाढविले आहेत. आगामी काळात आणखी रुग्णालयांनी कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी पुढाकार घ्यावा, म्हणून उपायुक्त धनराज पांडे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.
सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी बेड
कोरोना काळात मध्यम, तीव्र व अतितीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी म्हणजे ज्या रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरज आहे, अशांसाठीच रुग्णालयांमधील बेड वापरावेत, असे आदेश जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. तरीही काही रुग्णालयांमध्ये सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी बेडचा वापर होऊ लागला आहे. प्रत्येक रुग्णालयामधील बेडची पडताळणी करण्यासाठी शहरात उपायुक्त तर ग्रामीणमध्ये तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. मात्र, समितीकडून अजूनही पडताळणी झालेली नाही. काही दिवसांपूर्वी उपायुक्त धनराज पांडे यांनी रुग्णालयांसह श्रीमंत व्यक्तींना सूचना करून रिपोर्ट येण्यापूर्वी बेड बुकिंग न करण्याचे आवाहनही केले होते.
आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ठोस नियोजन
शहरातील कोरोनाबाधितांना वेळेत उपचार मिळावेत, या हेतूने आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी चार खासगी हॉस्पिटल वाढविण्यात येणार आहेत. या हॉस्पिटलमध्ये एकूण 70 बेड असणार आहेत.
- डॉ. बिरुदेव दुधभाते,
आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.