3corona_805.jpg
3corona_805.jpg 
सोलापूर

सोलापूर ग्रामीणची रुग्णसंख्या दोन हजारांच्या पुढे ! आज 'या' गावात सापडले 147 पॉझिटिव्ह 

तात्या लांडगे

सोलापूर : ग्रामीण भागातील एक हजार 606 व्यक्‍तींची रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 147 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून आता रुग्णसंख्या दोन हजार 140 झाली आहे. बाणेगाव, कान्हापुरी व किणी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या आता 48 झाली आहे. 

अक्‍कलकोट तालुक्‍यातील बोरोटीत एक तर किणीत तब्बल 15 रुग्ण सापडले आहेत. करमाळ्यातील अळसुंदे येथे एक तर माढ्यातील रिधोरे येथे आठ रुग्ण आढळले आहेत. मंगळवेढ्यातील सबजेलमध्ये एक रुग्ण सापडला आहे. मोहोळमधील भुसार गल्लीत एक, साठे नगरात तीन, सोमराय नगरात दोन, कामती बु. येथे एक रुग्ण आढळला आहे. माळशिरस तालुक्‍यातील विझोरी येथे चार रुग्ण तर सांगोल्यातील निजामपूर येथे पाच रुग्ण सापडले आहेत. तसेच दक्षिण सोलापुरातील होनमुर्गीत एक, कासेगावात 20, बसवेश्‍वर नगरात एक, मंद्रूप येथे आठ, मुळेगाव तांडा येथे एक रुग्ण सापडला आहे. पंढरपुरातील ईसबावी, जुनी पेठ, कालिकादेवी मंदिराजवळ, काशी कापड गल्ली, लक्ष्मी नगर, मनिषा नगर, उमडे गल्ली, भातंबरे येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तर लक्ष्मी टाकळीत 18, भोसे येथे दोन, संत पेठेत दोन, पोलिस लाईनला चार, महावीर नगरात दहा रुग्ण सापडले आहेत. 

ठळक बाबी... 

  • आतापर्यंत जिल्ह्यातील 16 हजार 204 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  • मंगळवारी (ता. 21) एक हजार 606 व्यक्‍तींची टेस्ट; 147 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह 
  • बाणेगाव (ता. उत्तर सोलापूर), कान्हापुरी (ता. पंढरपूर) आणि किणी (ता. अक्‍कलकोट) येथील तिघांचा झाला मृत्यू 
  • रुग्णसंख्येत बार्शी अन्‌ दक्षिण सोलापूर अव्वल; ग्रामीणमध्ये दोन हजार 711 व्यक्‍ती होम क्‍वारंटाईन तर दोन हजार 107 व्यक्‍ती विलगीकरण केंद्रात 
  • ग्रामीणमध्ये आतापर्यंत 48 जणांचे कोरोनाने घेतले बळी; 619 रुग्णांची कोरोनावर मात 
  •  

तालुकानिहाय रुग्णसंख्या 

  • अक्‍कलकोट : 375 
  • बार्शी : 514 
  • करमाळा : 26 
  • माढा : 83 
  • माळशिरस : 93 
  • मंगळवेढा : 53 
  • मोहोळ : 157 
  • उत्तर सोलापूर : 171 
  • पंढरपूर : 197 
  • सांगोला : 18 
  • दक्षिण सोलापूर : 454 
  • एकूण : 2,141  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT