Solapur News esakal
सोलापूर

Solapur News : वादळात घराचे नुकसान झालेल्यांना आवास योजनेतून लाभ देण्याची मागणी करणार परिचारक

काल सायंकाळी मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागात अवकाळी वादळामुळे शंभरहून अधिक घराचे पत्रे उडून गेले

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : अवकाळी वादळ व पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानीची पाहणी करून पडझड झालेल्या घरांना आवास योजनेतून घरकुलाचा लाभ देण्याबाबतची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले.

काल सायंकाळी मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागात अवकाळी वादळामुळे शंभरहून अधिक घराचे पत्रे उडून गेले, जनावराच्या शेडचे नुकसान झाले,तर फळबागा व त्यावरील आच्छादनचेही नुकसान झाले.तर ठिकाणी जनावरेही जखमी झाले व नागरिकांना देखील पत्रावरील दगड पडून जखमी झाले.या झालेल्या नुकसानीची पाहणी आज त्यांनी केली. त्यावेळी ते जालिहाळ येथे बोलत होते त्यांच्या समवेत दामाजी कारखान्याचे संचालक औदुंबर वाडदेकर, युन्नुश शेख,माजी सरपंच सचिन चौगुले नाथाबा शेंडगे, सुरेश कांबळे,भारत शेंबडे,आप्पासो सोलनकर,मनोज सोलनकर,दत्ता कर्वे,अंकुश शेंबडे,नाना टपरे,मारुती शेंडगे,दत्ता शेंडगे आदी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी नुकसानीची पाहणी केल्यानंतर शेतीपेक्षा घराचे नुकसान हे अधिक असून या घराच्या नुकसानीचे मूल्यांकन जास्तीत जास्त नोंदवून त्यामध्ये एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना अधिकाय्राना दिल्या व वादळामुळे अनेक घराचे पडझड झाली. त्यामुळे काही लाभार्थ्यांना त्यांचे घरे पुन्हा बांधावी लागणार आहे.

अशा लाभार्थ्यांना प्रधानमंत्री अथवा रमाई आवास योजनेतून घरकुलाचा लाभ मिळाला त्यामधील काही घरे या नुकसानीत पुन्हा बाधित झाली त्यांना पुन्हा घरकुलाचा लाभ देण्यासंदर्भातची मागणी आपण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहे व बाधितांना लवकरात लवकर नुकसान भरपाई कशी मिळेल या संदर्भात देखील प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यावेळी नाथ्याबा शेंडगे या लाभार्थ्यांच्या घराच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर त्यांना तातडीची मदत म्हणून पंधरा हजार रुपयाची आर्थिक मदत करत लाभार्थ्याला दिलासा देण्याचे काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT