OBC community needs to unite their right to justice ramesh Baraskar protest obc reservation 
सोलापूर

OBC Reservation : ओबीसी समाजाने आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र येणे गरजेचे - रमेश बारसकर

कुर्डूवाडी येथे एल्गार परिषदेचे आयोजन

राजकुमार शहा

मोहोळ : ओबीसी समाजाने स्वतःच्या न्याय हक्कासाठी एकत्रित येणे हे गरजेचे आहे,ती काळाची गरज आहे. हीच ती वेळ आहे असे सांगत कुर्डूवाडी ता माढा येथे होणाऱ्या 31 ऑक्टोबरच्या "ओबीसी यल्गार परिषद"देत ओबीसी समाजातील सर्व जाती धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे अवाहन ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी केले.

मोहोळ येथे शनिवार ता 30 रोजी आयोजित करण्यात आलेल्या विचार विनिमय बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष दत्तात्रय घाडगे होते. यावेळी व्यासपिठावर भटक्या विमुक्त समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले,

उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश जाधव,शंकर गोरे ,मधुकर बनसोडे शंकर वाघमारे ,सागर पडघळ,विनोद कांबळे, मारूती रोकडे,स्वप्निल जानराव,विशाल गोडसे, डॉ सागर बोराटे,विकी घुगे,शिलवंत क्षीरसागर,मंगेश पांढरे आदी सह जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्ते तसेच उस्मानाबाद, तुळजापूर, पुणे इंदापूर, बारामती या ठिकाणा वरून ही पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी या बैठकीत विविध ठराव करण्यात आले. त्यात मराठा समाजाला ओबीसीच्या कोटयातून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे,धनगर समाज व भटक्या विमुक्त समाजास एस टी प्रर्वगातून आरक्षण द्यावे,ओबीसींची जातनिहाय जन गनणा झाली पाहिजे,

विधानसभा व लोकसभेत ओबीसींना आरक्षण द्यावे,ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांना "ओबीसी जननायक" ही पदवी प्रदान करावी अशा प्रकारचे ठराव करण्यात आले. दरम्यान कुर्डूवाडी येथे 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ओबीसी एल्गार परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार पदाधिकारी कार्यकर्ते यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vertical Property Card : महाराष्ट्रातील प्रत्येक सदनिकेला स्वतंत्र ओळख क्रमांक आणि मालकी हक्कांची सरकारी नोंद मिळणार; महसूल विभागाकडून व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डचा मसुदा खुला

Hinjewadi Metro : हिंजवडी-वाकडमधील मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी पीएमआरडीएचा निर्णय; २६ जोडरस्त्यांचा विकास, डिसेंबरअखेर प्रत्यक्ष कामांना सुरुवात

High Court Gift Deed Ruling : "२० वर्षांपूर्वी सुनेला बक्षीसपत्राने दिलेली मालमत्ता सासूला परत मागता येणार नाही!" उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Jalgaon Jalna Railway Line Tunnel : मराठवाडा-खानदेशचा प्रवास सुसाट होणार! जळगाव-जालना रेल्वे मार्गावर बनणार देशातील सर्वात मोठा २३.५ किमीचा बोगदा; ३३६ किमीचे अंतर येणार थेट निम्म्यावर!

Pune News : स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला ‘डीआयएटी’चे बळ; अत्याधुनिक लेझर आणि फोटॉनिक्स प्रणाली विकसित करणार

SCROLL FOR NEXT