Killa Bandhani 
सोलापूर

ऑनलाइन शिक्षणातून सुटी मिळताच सुरू झाली किल्ला बांधणीसाठी बालगोपाळांची लगबग

शांतिलाल काशीद

मळेगाव (सोलापूर) : माती, विटा, दगड, विविध रंग, झेंडे, धान्य आदी साहित्य एकत्रित करीत किल्ला बांधणीसाठी बालगोपाळांची लगबग सुरू झाली आहे. कोरोनाच्या अंध:कारामुळे सर्वच सण अत्यंत साधेपणाने साजरे केले जात आहेत. यंदाच्या दिवाळी सणावर देखील कोरोनाचे सावट दिसून येत आहे. अंध:काराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारी दिवाळी काही दिवसांवर आली आहे. त्यामुळेच किल्ला उभारणीसाठी सर्वाधिक लगबग लहानग्यांची दिसून येत आहे. 

तसेच राज्यभरात विविध ठिकाणी किल्ला उभारणीसाठी स्पर्धा देखील सुरू झाल्या आहेत. मोबाईल गेम, व्हिडीओ गेम यामध्ये व्यस्त असणारी मुले सध्या आकर्षक, दिमाखदार व भव्य किल्ला उभारणीत व्यस्त झाली आहेत. कोरोनामुळे सर्वच शाळा बंद आहेत. मात्र ऑनलाइन शिक्षण सुरू होते. अशातच ऑनलाइन शिक्षणातून विद्यार्थ्यांना सुटी मिळताच मुलांच्या कल्पकतेला व सृजनशीलतेला किल्ला बांधणीतून वाव मिळत आहे. 

महाराष्ट्र ही छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजीराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. त्यांच्या पराक्रमाची व शौर्याची साक्ष देणारे अनेक गडकोट किल्ले दिमाखात उभे आहेत. त्यांचीच प्रतिकृती साकारत अनेक युवक व लहान मुले आपल्या घरांसमोर आकर्षक, दिमाखदार किल्ले तयार करत आहेत. किल्ले उभारणीची जणू एक स्पर्धाच सुरू झाली आहे. दगड - विटा गोळा करण्यासाठी सुरू असलेली लगबग, चिखलाने माखलेले हात, केलेली आकर्षक रंगरंगोटी, कागदी व कापडी झेंडे यामधून मुलांमध्ये एक वेगळीच ऊर्जा व उत्साह दिसून येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, मावळे, मंदिर, तटबंदी यामुळे जणू प्रत्यक्षात किल्ला पाहिल्याचा आनंद होत आहे. मोबाईलच्या व संगणकाच्या युगात देखील किल्ले उभारण्याची बालगोपाळांची आवड व धडपड खरंच कौतुकास्पद व गौरवास्पद आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

March Ending: 31 मार्चपूर्वी करा हे काम! नाहीतर PF आणि पेन्शन खाते होऊ शकते निष्क्रिय; करसवलतीचा लाभही मिळणार नाही

Ayodhya Ram Mandir : काय आहे राम मंदिरात बसवले जाणारे 'श्री राम यंत्र'? राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार भव्य सोहळा!

Nashik Municipal Corporation : नाशिककरांनो सावधान! महापालिकेच्या सर्वेक्षणात दीड लाखांहून अधिक नळजोडण्या आढळल्या नियमबाह्य

Jim Corbett: जिम कॉर्बेटचा हाऊसफुल्ल! बुकिंग उघडताच काही मिनिटांत ४१ खोल्या बुक; करावी लागतेय वर्षभर प्रतीक्षा!

Ratnagiri Farmer : जिल्ह्यात सकाळी धुके, दुपारी उन्हाचा कडाका; विचित्र; वातावरण, कमाल तापमान ३८ अंशांवर, बागायतदार चिंतेत

SCROLL FOR NEXT