Post Card 
सोलापूर

बादोल्याच्या शिक्षकांची विद्यार्थ्यांना टपालाद्वारे भावनिक साद ! टपालदिनाच्या पार्श्वभूमीवर नावीन्यपूर्ण उपक्रम 

राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : बादोले (ता. अक्कलकोट) येथील के. पी. गायकवाड हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक व शिक्षकांकडून सात महिन्यांपासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांची ओढ लागली आहे. त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांशी टपालाद्वारे संवाद साधत आहेत. जागतिक टपालदिनाचे (9 ऑक्‍टोबर) औचित्य साधून आयोजित या उपक्रमातून विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबीयांची कोरोना काळातील मानसिक तणावाच्या वातावरणाची चौकशी, याशिवाय अभ्यास व शैक्षणिक मार्गदर्शन टपालातून करण्यात येत आहे. 

गेल्या सात महिन्यांपासून शाळेपासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी भावनिक साद घातली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे पालक व विद्यार्थी वर्गातून स्वागत होत आहे. बादोल्याच्या या शाळेत पाचवी ते दहावी या वर्गात एकूण 350 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील गुमास्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेने नागनाथ धर्मसाले, कैलाश गायकवाड, सूर्यकांत लवटे, महादेव सोनकर, मयूर दंतकाळे यांनी टपालातून निसर्ग, पर्यावरणचित्रे तसेच मजकूर यांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधत पत्रे लिहून त्याचे वितरण केले जात आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी पोस्टमन व इतरांच्या सहकार्याने हे कार्य केले आत आहे. 

विद्यार्थ्यांच्या पत्रात अभ्यास कसा सुरू आहे, कोरोना काळात स्वतःची व कुटुंबाची काळजी घेणे, मोबाईल वापर फक्त शिक्षणासाठीच करणे, आईवडिलांना त्यांच्या कामात मदत करीत जा, अभ्यासात अडचण आल्यास शिक्षकांना संपर्क करा आदी गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. आणि शेवटी, प्रत्येक विद्यार्थ्याने पत्राचे उत्तर व खुशाली शाळेला अवश्‍य कळवावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. या पत्र वितरण कामासाठी पोस्टमन सादिक जमादार-तांबोळी, राम बगले, सिद्धाराम वाकडे, भीम कोरे, कट्टेप्पा गायकवाड तसेच माजी विद्यार्थी देखील सहकार्य करत आहेत. बादोल्याच्या या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या गावातील देवळावरील स्पीकरवरील शिक्षणानंतर आता सर्व विद्यार्थ्यांच्या खुशालीची विचारपूस करणारा हा पत्रलेखनातून संवाद घडविण्यासाठीचा उपक्रम मात्र आनंददायी ठरत आहे, हे मात्र निश्‍चित आहे. 

या उपक्रमाबाबत कलाशिक्षक मयूर दंतकाळे म्हणाले, कोरोनामुळे सात महिन्यांपासून विद्यार्थी शाळेपासून दूर आहेत. त्यांची खुशाली विचारणे व अडचणी जाणून घेणे यासाठी जागतिक टपाल दिनानिमित्त शाळेकडून उपक्रम राबविण्यात आला आहे. यातून विद्यार्थ्यांशी संपर्क होऊन अडचणी जाणल्या जाणार आहेत. हा उपक्रम आम्हा सर्वांना निखळ आनंद देणारा व ऊर्जा निर्माण करणारा ठरणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT