crime 
सोलापूर

टेंभुर्णीतील जनता विद्यालयाच्या अध्यक्षासह पदाधिकारी फरार ! "ऍट्रॉसिटी' दाखल; काय आहे प्रकरण?

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : टेंभुर्णीतील जनता विद्यालयातील 12 वर्षांपासून रिक्त शिपाई पदावर अनुकंपा तत्त्वावरील नेमणूक इतर मागासवर्गीय उमेदवाराला डावलून खुल्या वर्गातील व्यक्तीची नेमणूक केल्याप्रकरणी येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सचिवासह विश्वस्त व मुख्याध्यापक अशा एकूण 12 जणांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हे सगळे फरार झाले आहेत. 

नागरी हक्क संरक्षण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या आदेशानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. पी. आर. सुतार, सुभाष मेथा, डी. व्ही. देशमुख, आर. ए. महामुनी, संतोष पाटील, विलास राजमाने, गंगाधर उबाळे, जवाहर मेथा, डी. के. देशमुख, एच. एम. तांबोळी, मुख्याध्यापक प्रमोद भोसले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 2008 पासून आतापर्यंत संस्था व शाळेत कार्यरत मुख्याध्यापकांचा संशयितांत समावेश आहे. 

जनता विद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक पदावर कार्यरत भागवत भीमराव राजगुरू यांचे सेवेत असताना निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र सागर भागवत राजगुरू यांनी वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी शिक्षण प्रसारक मंडळाकडे अर्ज केला होता. मात्र 2008 ते 2020 पर्यंत शिक्षण प्रसारक मंडळाने राजगुरू यांचा अनुकंपा तत्त्वावरील नेमणुकीचा प्रस्ताव शिक्षण विभागाला पाठवला नसल्याचे राजगुरू यांचे म्हणणे होते. 2013 मध्ये सागर राजगुरू यांच्या जागी खुल्या वर्गातील एकाची नेमणूक केली. याप्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षणमंत्री, शिक्षण उपसंचालक, शिक्षण आयुक्तांनी नेमणूक करण्याचे अनेक पत्र शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त व मुख्याध्यापकांना पाठवले होते. परंतु मंडळाने वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश डावलून सागर राजगुरू यांची नेमणूक करण्यास टाळाटाळ केली. 

नागरी हक्‍क संरक्षण पथकाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांचे आदेश 
सागर राजगुरू यांनी वर्षापूर्वी येथील पोलिस ठाण्यात जनता विद्यालयाच्या विश्वस्तांसह मुख्याध्यापकांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. परंतु त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. त्यानंतर त्यांनी गतवर्षी नागपूर येथे विधिमंडळाच्या अधिवेशन काळात उपोषण केले होते. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. सागर राजगुरू यांच्या तक्रारीची दखल घेत नागरी हक्क संरक्षण पथकाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांनी सोलापूरच्या पोलिस अधीक्षकांना याप्रकरणी ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT