Railway Overbreej 
सोलापूर

सोलापुरातील ब्रिटिशकालीन पूल ठरतोय रेल्वे विद्युतीकरणाला अडथळा ! रेल्वेने लढवली शक्कल अन्‌...

विजय थोरात

सोलापूर : मध्य रेल्वे सोलापूर विभागात विद्युतीकरण आणि दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र सोलापूर रेल्वे स्थानकासमोर असलेला 1922 चा ब्रिटिशकालीन पूल विद्युतीकरणाच्या कामास अडथळा ठरत आहे. त्यामुळे हा पूल पाडून नव्याने बांधावा लागणार आहे. हा पूल नव्याने बांधून पूर्ण होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून पुलाखालून जाणारे रेल्वे रुळ 75 मीलिमीटर लोअरिंग करून खाली घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. 

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात याच पद्धतीने काम करण्यात आले होते. त्यानंतर सोलापूर विभागात असा दुसरा प्रयोग केला जात आहे. दमाणीनगर येथील पूल हा 1922 मध्ये बांधण्यात आला आहे. मात्र सोलापूर विभागात विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, पुलामुळे विद्युतीकरणाचे काम थांबले आहे. आता रुळ लोअरिंगमुळे आता हे काम थांबणार नाही. 

दमाणीनगर येथे विद्युतीकरणाचे पोल उभारणीचे काम देखील सुरू आहे. जुन्या पुलामुळे विजेचे केबल्स टाकण्य अडथळा ठरत आहे. नवीन पूल तयार होण्यास एक वर्षाचा कालावधी लागू शकतो. रुळ लोअरिंगचे काम आजपासून हाती घेतले असून, 30 एप्रिलपर्यंत लोअरिंगचे काम पूर्ण करणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. रुळाचे काम हे सोलापूर विभागाकडून करण्यात येणार आहे. विद्युतीकरणाचे काम येत्या पूर्ण होणार आहे. रुळ खाली घेण्याचे काम हे रेल विकास निगम लिमिटेड यांच्याकडून करण्यात येणार आहे. 

पुलाखाली रेल्वे रुळाचे 75 मिलिमीटर लोअरिंग करण्यात येणार असून, पुलाच्या समोरील आणि पाठीमागील बाजू 200 मीटरपासून काम करण्यात येणार आहे. पावसाळ्यात याला कोणताही अडथळा येणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. 

ठळक बाबी... 

  • पुलाच्या दोन्ही बाजूस 200 मीटरपासून केले जाईल काम 
  • पावसाळ्यात पाणी थांबणार नाही यासाठी ड्रेनची निर्मिती करण्यात येईल 
  • ट्रॅक रोलिंगचे काम सुरू असताना गाड्यांचा वेग राहणार ताशी 20 किलोमीटर 
  • गाड्यांचा ब्लॉक घेण्याची आवश्‍यकता भासणार नाही 
  • 30 एप्रिलपर्यंत होणार काम पूर्ण 

दमाणीनगर येथील रेल्वे पुलाच्या खाली रुळ लोअरिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. लोअरिंगचे काम पूर्ण होताच येथील ओएचई उभारणीचे काम सुरू करण्यात येईल. लोअरिंगचे काम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. 
- प्रदीप हिरडे, 
वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: आपल्यावर कुणी हात घालू शकतो त्याने विचार केला नव्हता, पण... पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांनी सांगितला अटकेचा थरार

Latest Marathi News Live Update : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल

Beed News:मुलींनो एचपीव्ही लस घ्या; लसीमुळे तुम्हाला कोणताच धोका होणार नाही; अनेकांची पाठ; आकडे सांगताहेत भविष्यातील कर्करोगाची वाट; गैरसमज चुकीचा

Kolhapur Air Connectivity : कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद व बंगळूरसाठी नवीन, सुधारित विमानसेवा सुरू; सोयीस्कर प्रवास होणार

Chhatrapati Sambhajinagar: रॉकेल मिळणार; पण ‘स्टोव्ह’ कुठून आणणार?; अनेक कुटुंबांचा प्रश्न ः एकच सिलिंडर असलेल्या गृहिणींपुढे अडचणींचा भडका

SCROLL FOR NEXT