Nagane
Nagane 
सोलापूर

मद्यधुंद ट्रॅक्‍टरचालकाने दिलेल्या धडकेत मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्धाचा जागीच मृत्यू ! 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : मॉर्निग वॉक करत असताना एका वृद्धाला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या उसाच्या रिकाम्या ट्रॅक्‍टरने जोरात धडक दिली. यामध्ये तुकाराम नागणे (वय 75) या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (गुरुवारी) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पंढरपूर - सातारा राष्ट्रीय महामार्गावरील उपरी गावाजवळच्या नागणेवाडी परिसरात घडला. 

याबाबतची माहिती अशी, की उपरी येथील तुकाराम नागणे हे आज सकाळी घरापासून जवळच असलेल्या महामार्गालगत मॉर्निंग वॉकला गेले होते. मॉर्निंग वॉक करत असताना भाळवणीकडून पंढरपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्‍टरने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने ट्रॅक्‍टरसह पळून जाण्याचा प्रयत्न केला होता; परंतु जवळच थांबलेल्या तरुणांनी मोटारसायकलवरून पाठलाग करून दोन किलीमीटर अंतरावर ट्रॅक्‍टर थांबवला. त्या वेळी ट्रॅक्‍टर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. 

अपघातात मृत्यू झालेले तुकाराम नागणे हे पंढरपूर येथील पूजा ज्वलर्सचे मालक सुभाष नागणे यांचे वडील होत. त्यांच्या मागे तीन विवाहित मुले, एक मुलगी व सुना नातवंडे असा परिवार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT