omicron patient
omicron patient sakal
सोलापूर

तिसऱ्या लाटेतही 'डेल्टा'चे रुग्ण! सौम्य लक्षणांची रुग्णसंख्या अधिक

अरविंद मोटे

सध्या रुग्णालयात दाखल होणारे ओमिक्रॉनसदृश रुग्णांची संख्या जास्त असली तरी हे रुग्ण अगदीच तीन ते पाच दिवसांत बरे होत आहेत.

सोलापूर : सध्या रुग्णालयात दाखल होणारे ओमिक्रॉनसदृश (Omicron) रुग्णांची संख्या जास्त असली तरी हे रुग्ण अगदीच तीन ते पाच दिवसांत बरे होत आहेत. पण त्यासोबत डेल्टा (Delta) व्हायरसचे रुग्ण मात्र अजूनही प्रभावी उपचाराशिवाय बरे होत नसल्याचे दिसून येत आहे. शहरात तिसऱ्या लाटेत जे रुग्ण दाखल होत आहेत, त्यामध्ये दहापैकी 8 ते 9 रुग्ण हे ओमिक्रॉनसदृश प्रकारचे आहेत. या प्रकारच्या रुग्णांमध्ये सीटी स्कॅन किंवा एक्‍स-रेमध्ये फुफ्फुसामधील संसर्ग दिसत नाही. या रुग्णांच्या लक्षणांची तीव्रता अतिशय कमी असल्याने उपचारही सौम्य व बरे होण्याचा कालावधी सध्यातरी कमी आहे. हे रुग्ण लवकर बरे होत आहेत. मात्र, दहा रुग्णांपैकी एक ते दोन रुग्ण डेल्टाचे असल्याचे दिसून येत आहे. या रुग्णांच्या एक्‍स-रेमध्ये फुफ्फुसातील संसर्ग पाहावयास मिळतो. तसेच दुसऱ्या लाटेतील रुग्णांमध्ये जी गंभीर लक्षणे दिसत होती ती या रुग्णांत दिसून येत आहेत. त्यांना अधिक औषधोपचार करावा लागत आहे. डेल्टाचा संसर्ग धोकादायक मानला जातो. (Omicron's symptoms are mild and delta patients are also seen in the third wave)

अँटीबॉडी कॉकटेल सर्वात प्रभावी

डेल्टासारख्या गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना सध्या अँटीबॉडी कॉकटेल (Antibody Cocktail) अत्यंत उपयुक्त ठरत आहे. त्या डबल डोसची किंमत 1 लाख 20 हजार रुपये एवढी आहे. मात्र, त्याचे उपचारातील परिणामदेखील खूपच चांगले मिळत आहेत. मधुमेह (Diabetes), रक्तदाब (Blood Pressure) व इतर आजार असलेल्या रुग्णांना डेल्टासदृश गंभीर संसर्ग असलेल्या रुग्णांना तत्काळ धोक्‍यातून बाहेर येण्यासाठी हे औषध उपयोगी ठरते आहे.

नवीन औषध मोल्लोफ्लेवोपीर

यापूर्वीच्या लाटेत फ्लेवोपीर (Flavoper) या गोळीचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला गेला आहे. मात्र त्यानंतर आता मोनोफ्लेवोपीर (Monoflavoper) ही नवीन गोळी बाजारात उपलब्ध झाली आहे. त्याचा उपयोग प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर लगेच उपचारासाठी केला जाणार आहे. अन्य औषधांमध्ये अद्याप संशोधने सुरू आहेत.

डेल्टा अजूनही एंडमिक

डेल्टासदृश विषाणू जो की, संसर्गाच्या बाबतीत गंभीर परिणाम करणारा आहे, हा डेल्टा अजूनही साथीच्या स्थितीत (एंडमिक) आहे. सर्वसाधारणपणे विषाणू संसर्गजन्य अवस्थेतून स्पोरॅडिक म्हणजे तुरळक संसर्गाच्या स्थितीत जातो; पण डेल्टासदृश विषाणूच्या बाबतीत अजून हा बदल झाला नाही. हा बदल झाला तर त्याच्या संसर्गाचे प्रमाण कमी होऊ शकते.

सध्या दाखल होणाऱ्या कोरोनासदृश (Covid-19) रुग्णांमधील बहुतांश रुग्णांमध्ये कोरोना संसर्गाचा छातीच्या एक्‍स-रेमध्ये दिसून येणारा फुफ्फुसामधील संसर्ग दिसून येत नाही. मात्र, काही रुग्णांत दुसऱ्या लाटेतील गंभीर रुग्णांप्रमाणेच गंभीर लक्षणे दिसून येत आहेत.

- डॉ. निर्मलकुमार तापडिया (Dr. Nirmal Kumar Tapdia), फिजिशयन, अश्‍विनी रुग्णालय, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT