arrest sakal
सोलापूर

सोलापूर : सुपारी ट्रक अपहरण प्रकरणी एकाला अटक

९७ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

सकाळ वृत्तसेवा

कुर्डुवाडी - कर्नाटकमधून उत्तरप्रदेश येथे ट्रक कंटेनरमधून घेउन जात असलेल्या सुमारे एक कोटी ३३ लाख रुपयांच्या सुपारीचा दोन ट्रक चालकांनी अपहार केला होता. त्यापैकी ९७ लाख ६५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह एका चालकास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व कुर्डुवाडी पोलिसांनी कर्नाटकमधून अटक केली.

शोध मोहिम यशस्वी होण्यामध्ये ट्रकचे जीपीएस व मोबाईल लोकेशनच्या अद्ययावत तंत्रज्ञानाने मोलाची भूमिका पार पाडली. वाहनचालक संतोष चंद्रप्पा एन्नर (रा, हिरेकेरुर, कर्नाटक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयाने उद्यापर्यंत (शुक्रवार) पोलिस कोठडी सुनावली आहे. व्हीआरएल लॉजिस्टिक्स लि. हुबळी या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रक म्हैसगाव (ता. माढा) येथे रस्त्याच्या बाजूला आढळून आला होता. दोन्ही चालकांनी पलायन केले होते व माल ही गायब केला होता. याबाबत ट्रान्सपोर्ट कंपनीचे सोलापूर येथील सहायक व्यवस्थापक केशव हिरासकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वसंतकुमार एस. नारायणाप्पा व संतोष चंद्रप्पा एन्नर यांच्या विरुद्ध कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप, सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत बोधे यांच्या सुचनेनुसार कुर्डुवाडीचे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे व त्यांच्या पथकाने कर्नाटकातील हुबळी, चित्रदुर्ग, बंगळुरु, हवेरी, तुमकुर या ठिकाणी शोध घेतला. यामध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, बिराजी पारेकर, श्रीकांत गायकवाड, सुशांत शिंदे, विश्‍वजित ठोंगे, व्यंकटेश मोरे, आबासाहेब मुंढे, विजयकुमार भरले, हरिदास पांढरे, सलीम बागवान, रवी माने, सचिन गायकवाड यांनी कामगिरी बजावली.

सायबर सेलची झाली मदत

सायबर सेलकडून ज्याठिकाणी माल दुसऱ्या गाडीत भरण्यात आला तेथील मोबाईल लोकेशनही पाहण्यात आले. या मदतीने कर्नाटकातून एन्नर यास पोलिसांनी अटक केली. सदर अपहार केलेल्या मुद्देमालापैकी भिमसमुद्र (जि. चित्रदुर्ग, कर्नाटक) येथुन ९७ लाख ६५ हजार रुपयांची २१ टन सुपारी हस्तगत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja Visarjan 2026 : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाही होणार विलंब? गिरगाव चौपाटीवरील 'त्या' नैसर्गिक कारणामुळे वाढली चिंता; प्रशासनासमोर मोठं आव्हान

‘आईला सोडून कसा जाऊ? आधी तिला बाहेर काढतो’... शेवटपर्यंत झुंजला, अखेर बस आगीत माय-लेकाचा मृत्यू; अंगठीवरून पटली ओळख

‘तुम्हाला काय प्रॉब्लेम?’ सततच्या चर्चांवर गोविंदांचा सवाल; म्हणाला...‘माझ्या खासगी आयुष्याचा तमाशा करू नका’

Latest Marathi News Live Update : मुंबईत विसर्जन मिरवणुकीत दुर्घटना; प्रभादेवीत भरधाव कार थेट गर्दीत घुसली, चार जणांना दुखापत

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

SCROLL FOR NEXT