corona 
सोलापूर

बार्शीतील एकाचा मृत्यू, सोलापूरच्या ग्रामीण भागात वाढले 27 कोरोना बाधित 

प्रमोद बोडके

सोलापूर : बार्शी शहरातील कसबा पेठेतील 75 वर्षिय पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला 26 जून रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास सोलापुरातील गंगामाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला आहे. सोलापूरच्या ग्रामीण भागात या एका मृत्यूसह नवीन 27 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये 18 पुरुष व नऊ महिलांचा समावेश आहे. 

आज दुपारी 4 वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 238 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 211 अहवाल निगेटिव्ह असून 27 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. एकोणीस जण आज कोरोना मुक्त झाले आहेत. नव्याने सापडलेल्या 27 कोरोना बाधित रुग्णांमध्ये उत्तर सोलापूर तालुक्‍यातील पाकणी येथील दोन पुरुष व एक महिला, बीबी दारफळ येथील एक महिला, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील होटगी स्टेशन येथील एक पुरुष, बोरामणी येथील तीन पुरुष व एक महिला, अक्कलकोट तालुक्‍यातील बोरगाव येथील एक पुरुष व दोन महिला, सलगर येथील एक पुरुष व एक महिला, गुरववाडी येथील एक पुरुष, अक्कलकोट शहरातील किस्तके मळा येथील एक पुरुष, अक्कलकोट शहरातील बुधवार पेठेतील एक पुरुष, अक्कलकोट शहरातील इंदिरानगर येथील एक महिला, अक्कलकोट शहरातील आजाद गल्ली येथील एक पुरुष, अक्कलकोटमधील समर्थनगर येथील एक पुरुष यांचा समावेश आहे. बार्शी येथील पाटील प्लॉटमधील एक महिला, बार्शी तालुक्‍यातील साकत पिंपरी येथील एक पुरुष, बार्शी शहरातील बारंगुळे प्लॉटमधील एक पुरुष, बार्शीतील आदर्शनगरमधील एक पुरुष, माढा तालुक्‍यातील सीना दारफळ येथील एक पुरुष, बार्शी शहरातील कसबा पेठ येथील एक पुरुष आणि मोहोळ तालुक्‍यातील हिंगणी (नि) येथील एक महिला यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

SCROLL FOR NEXT