Mohol Shock 
सोलापूर

विजेची तार अंगावर पडून मोहोळमध्ये एकाचा जागीच मृत्यू ! सुदैवाने वाचली मुलगी 

चंद्रकांत देवकते

मोहोळ (सोलापूर) : शहरातील समर्थ नगर जवळील शारदा नगर येथे अंगावर विजेची तार पडून एकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. 9) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. 

याबाबत अधिक माहिती अशी, की मोहोळमधील वाढीव भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शारदा नगर येथे मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास वसंत आप्पा कोळी (वय 50) हे आपल्या स्वत:च्या घराच्या गच्चीवर उभारले असताना अचानक घरावरील विद्युत वाहिनीची तार त्यांच्या अंगावर पडली. या वेळी ते खाली कोसळले. तत्काळ मुलगी स्वप्नाली वसंत कोळी व पत्नी प्रमिला वसंत कोळी यांनी त्यांना खासगी ऍम्ब्युलन्स बोलावून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड यांनी बेशुद्ध अवस्थेत आणलेल्या वसंत आप्पा कोळी यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचे सांगितले. 

सुदैवाने याच वेळी घराच्या खाली उभी असलेली वसंत आप्पा कोळी यांच्या मुलीच्या अंगावरील गाऊनला तार स्पर्श करून गेल्याने तिच्या कपड्याला झळ बसली; परंतु मुलीला इजा पोचली नाही. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT