Murtuj 
सोलापूर

मावा बनला दोस्तीमध्ये दरार ! दोन मित्रांमधील मारामारीत एकाचा मृत्यू

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : पार्टनरशिपमध्ये आचारी व्यवसाय करणाऱ्या दोन मित्रांमध्ये चेष्टामस्करीवरून माव्यासाठी किरकोळ भांडण झाले. भांडणाचे पर्यावसान मारामारीत झाले. यात एका मित्राने दुसऱ्या मित्राला ठोसा मारल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना क्रीडा संकुल, गुरुनानक नगराजवळील शानदार चौकात गुरुवारी (ता. 29) रात्री नऊ वाजता घडली. 

मुर्तूज फरदीन शेख (वय 30, रा. हुसेन नगर) असे भांडणात जखमी होऊन मृत्य झाल्याच्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास गुरुनानक चौकाजवळील शानदार चौकात मुर्तूज शेख व संशयित आरोपी अकील शेख हे दोघे क्रीडा संकुल परिसरात बसले होते. तेव्हा मावा खाण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. वादावादीमधून दोघा मित्रांमध्ये मारामारीला सुरवात झाली. त्या वेळी तेथील उपस्थितांनी मारामारी मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र जोराचा मार लागल्यामुळे मुर्तूज शेख तेथेच कोसळला. त्याला तेथे उपस्थित लोकांनी लगेच शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लगेच परिसराची पाहणी केली. या वेळी साहाय्यक पोलिस आयुक्त प्रीती टिपरे, सदर बझार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे घटनास्थळी दाखल झाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

मालमत्ता ४ कोटींची, मग १३ कोटींची रोल्स रॉयस कुठून आली? मैथिली ठाकूरच्या व्हिडीओवरून CAचा सवाल, चौकशीची मागणी

Bihar viral video case: जमुई अल्पवयीन मुलीचं छेडछाड प्रकरण! राष्ट्रीय महिला आयोग आक्रमक, पोलीस महासंचालकांना कठोर निर्देश

Lohara Crime : पतीने धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा केला खून; हल्ल्यानंतर पतीने स्वतःवर वार करून पोलिस ठाण्यात झाला हजर

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT