Accident 
सोलापूर

कुर्डुवाडी-शेटफळ रस्त्यावर ट्रक-मोटारसायकलच्या अपघातात एक ठार, एक जखमी 

वसंत कांबळे

कुर्डू (सोलापूर) : कुर्डुवाडी - शेटफळ रोडवरील कुर्डू हद्दीतील सोनार वाड्यानजीक रायगड हॉटेलजवळ मोटारसायकल व ट्रकच्या धडकेत एकजण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (ता. 16) सायं 7.15 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेची फिर्याद नंदकुमार गोरख राऊत (रा. सावता माळी नगर, टेंभुर्णी) यांनी कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात दिली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी, की एम एच 12 एफ झेड 8890 या क्रमांकाचा मालट्रक हा शेटफळकडे तर एम एच 45 क्‍यू 3662 या क्रमांकाच्या दुचाकीवरून दोघेजण कुर्डुवाडीकडे जात होते. कुर्डू हद्दीतील सोनार वाड्याजवळ येताच या दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन मोटारसायकलवरील अमोल सौदागर नाळे हा जागीच ठार झाला तर संदेश वाल्मीकी जाधव (वय 39, रा. दोघेही रा. पंचवटी, अकलूज, ता. माळशिरस) याचा पाय मोडला असून, गंभीर जखमी झाला आहे. जखमीस कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत. 

यातील संदेश जाधव हा गंभीर जखमी होऊन बेशुद्ध असल्याने रात्री उशिरापर्यंत मृत व्यक्तीची ओळख पटली नाही. रात्री 11 वाजता नातेवाइकांनी मृत व्यक्तीस ओळखल्यानंतर रात्री उशिरा या अपघाताची नोंद करण्यात आली. 

मालट्रक चालक बाबासाहेब मनोहर हजारे (रा. चौंडी, ता. धारूर, जिल्हा बीड) याच्या विरुद्ध फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार बाबासाहेब घाडगे हे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT