Accident Sakal
सोलापूर

रुग्णवाहिका व ट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यु, अन्य पाच जखमी

मालट्रकला रुग्णवाहिकेने पाठीमागुन धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले.

राजकुमार शहा

मालट्रकला रुग्णवाहिकेने पाठीमागुन धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले.

मोहोळ - मालट्रकला (Truck) रुग्णवाहिकेने (Ambulance) पाठीमागुन धडक देऊन झालेल्या अपघातात (Accident) एकाचा मृत्यू (Death) झाला, तर अन्य पाच जण गंभीर जखमी (Injured) झाले. हा अपघात सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वडाचीवाडी, ता. मोहोळ शिवारात सकाळी पावणे सात वाजता झाला. सुहास मुकुंद हौसलमल रा. वाशी असे मृताचे नाव आहे. तर डॉ. शैलेश आर. चौधरी वय-37, रा. बेलापूर. दत्ता अर्जुन खरटमल वय-38, रा. हैदराबाद, ज्योती दत्ता खरटमल वय-35, रा. हैदराबाद, विशाल सरदार वय-27, रा. वाशी, जय आप्पा एकनाथ कावळे वय-68, रा. कल्याण अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. सर्व जखमींना सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मालट्रक क्र. केए 41 ए 4293 ही सोलापूरच्या दिशेने निघाली होती, तर रुग्णवाहीका क्र. एम एच 4 जे यु 4742 ही ही सोलापूरच्या दिशेने निघाली होती. दोन्ही वाहने वडाचीवाडी शिवारात येताच रुग्णवाहिकेने पुढच्या मालट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली, त्यात वरील एक जण मयत तर अन्य पाच जण जखमी झाले. या अपघाताची मोहोळ पोलिसात झाली असून, अधिक तपास सहाय्यक फौजदार अविनाश शिंदे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT