One lakh loss due to fire in Pothare in Karmala taluka 
सोलापूर

हाता तोंडाशी आलेला घास गेला; मळणीसाठी काढून ठेवलेली २० क्विंटल तूर सूड वृत्तीतून दिली पेटून

नाना पठाडे

पोथरे (सोलापूर) : पोथरे (ता. करमाळा) येथे कमल कल्याण पाटील यांच्या शेतातील अडीच एकरातील मळणी करण्यासाठी गोळाकरून ठेवलेल्या तुरीच्या पिकाला अज्ञाताने पेटून दिले. यात २० किंटल तुर जळून खाक झाली आहे.

सदर घटना ही सूड वृत्तीची असून याबाबत ग्रामस्थांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. पोलिस यंत्रणेने तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामंस्थांडून केली जात आहे. 

सध्या तुरीची काढणी सुरू असून कमल पाटील यांनी आपल्या अडीच एकर क्षेत्रातील तूर मळणी करण्यासाठी शेतात एकत्रित गोळा करून ठेवली होती.

तूर शेतातच असल्याने तुरीच्या शेजारी कोणी नसल्याचा अंदाज घेऊन अज्ञात व्यक्तीने पहाटे जाऊन तुरीच्या पिकाला पेटवून दिले. या आगीत पूर्ण तूर जळून खाक झाली आहे. सकाळी ही घटना कळताच गाव कामगार तलाठी मयूर शिरसागर, रविंद्र जाधव यांनी घटनास्थळी जाऊन सदर घटनेचा पंचनामा केला आहे. या आगीत अडीच क्षेत्रावरील अंदाजे 20 क्विंटल तूर जळून खाक झाली आहे. त्यामुळे कमल पाटील यांचे एक लाख वीस हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. 

या पंचनाम यावर प्रकाश पाटील, नवनाथ झिंजाडे, शांतीलाल रोही, कल्याण पाटील, हनुमंत शिंदे आदींनी पंच म्हणून उपस्थित होते. सदर घटना ही मानवी वृत्तीला काळीमा फासणारी असून या घटनेचा गावातून तीव्र निषेध केला जात आहे. पोलीस यंत्रणेने संबंधित व्यक्तीचा तपास करून त्यावर कठोर कारवाई करावी आशी मागणी केली जात आहे. 

मोठ्या कष्टातून संपूर्ण कुटुंबाने पिकविलले पिक हाताशी आले असताना अशाप्रकारे जळून नष्ट होणे हे खूप वेदनादाई आहे. अशा क्रूर व्यक्तीचा शोध लावून त्यावर कठोर करा व कारवाई झालीच पाहिजे. 
- गोपीनाथ पाटील, शेतकरी, पोथरे 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT